अमळनेर: गांधलीपुरा भागातील देहविक्री व्यवसाय ज्या ठिकाणी चालतो त्या प्रतिबंधित क्षेत्रातील 75 हजार रुपये किमतीचे पाच सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याने अमळनेर पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की अमळनेर नगरपालिकेतर्फे गांधली पुरा भागातील प्रतिबंधित क्षेत्रात 24 सीसीटीव्ही कॅमेरे व फायबर ऑप्टिक केबल बसविण्यात आली आहे 24 पैकी 5 कॅमेरे व ऑप्टिक फायबर केबल असा 75 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला याप्रकरणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे आबिद शेख मोहम्मद शफी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.