अमळनेर, दि. ०६ : शहरातील भगवा चौक परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता या चौकात डीवायएसपी राकेश जाधव यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित करण्यात आले. नुकतेच या कॅमेºयांचा लोकार्पण सोहळा डॉ. अनिल शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियन बॅँकेचे शाखाव्यवस्थापक श्रीकांत भुसारे होते.
भगवा चौक परिसरात डॉ. अनिल शिंदे यांचे हॉस्पिटल आहे. युनियन बॅँक आहे. तसेच एसएनडीटी महिला महाविद्यालयदेखील आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात कॉलनी परिसरही आहे. हॉस्पिटल आवारात काही अनुचित प्रकार घडू नये, बॅँकेतून बाहेर आलेल्या ग्र्राहकांची लुटमार होऊ नये, महिला महाविद्यालय आवारात विद्यार्थीनींसोबत काही गैरप्रकार घडू नयेत तसेच कॉलनी परिसरात घरफोडी सारख्या घटना घडू नयेत, एकंदरीत सर्वप्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा या व्यापक दृष्टीने डीवायएसपी राकेश जाधव यांनी लोकसहभागातून या भागात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले आहेत. नुकताच कॅमेºयांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी डीवायएसपी राकेश जाधव, युनियन बॅँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत भुसारे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, डॉ. संदिप जोशी, डॉ. शरद बाविस्कर, प्रा. शाम पवार, गोपाल कुंभार, युनियन बॅँकेचे उदय पाटील, संभाजी पाटील, अमित ललवाणी, महेंद्र महाजन, सईद तेली, बापूराव ठाकरे, नरेंद्र पाटील, जयंत पाटील, प्रविण महाजन, दिपक काटे आदी उपस्थित होते. या वेळी
सूत्रसंचालन व आभार रवींद्र मोरे यांनी केले.