पाडळसे धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत व्हावा यासाठी सुरू असलेल्या 51 हजार पत्र आंदोलनात माथाडी कामगार हमाल मापाडी संघटना व अमळनेर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स फर्टीलायझर्स असोसिएशन ९ फेब्रुवारी च्या आंदोलनात सहभागी होणार

अमळनेर: तालुक्यातील पाडळसे धरण गतिमानतेने पूर्ण व्हावे व धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत व्हावा यासाठी सुरू असलेल्या 51 हजार पत्र आंदोलनात माथाडी कामगार हमाल मापाडी संघटना व अमळनेर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स फर्टीलायझर्स असोसिएशन यांनीही सहभाग घेत ९ फेब्रुवारी च्या आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे
अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नुकतीच येथील हमाल मापाडी संघटनेची बैठक संपन्न झाली.हमाल मापडी संघटनेच्यावतीने रमेश धनगर यांनी ‘जल है तो कल है’ अशी घोषणा देत पाडळसे धरण पूर्ण व्हावे म्हणून संघटनेच्या पाठिंबा जन आंदोलन समिती जाहीर केला.यावेळी जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी धरण पूर्तीसाठी सर्वसामान्य लोकांनी सहभागी व्हावे म्हणून पत्र आंदोलन सुरू केल्याचे सांगितले समितीचे रणजित शिंदे यांनी पाडळसे धरणाची किंमत अपूर्णनिधी अभावी हजार कोटींने वाढत असल्याने वेळीच जनतेचा दबाव निर्माण होणे गरजेचे आहे असे सांगितले.यावेळी समितीचे हे रामराव पवार, सुशिल भोईटे आदि उपस्थित होते.
अमळनेरच्या डुबकी मारोती मंदिर येथे अमळनेर तालुका सीड्स पेस्टिसाइड्स फर्टीलायझर्स असोसिएशनची बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत उपस्थित सभासदांनी मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे नावे पत्र लिहीत आंदोलनात सहभाग नोंदवला असून संघटना ९ फेब्रुवारीला समितीच्या सोबत असेल असे सांगितले यावेळी मुन्नाशेठ पारेख,विजय जैन यांचे सह जनआंदोलन समितीचे प्रशांत भदाणे, योगेश पवार ललित ब्रम्हेचा आदिनी मार्गदर्शन केले.जनआंदोलन समितीचे रविंद्र पाटील,रामराव पवार, सुशिल भोईटे आदिसह असोसिएशनचे मगन पाटील, दिपक पाटील,चेतन पाटील, सुनिल पाटील,किरण पाटील आदि उपस्थित होते

[democracy id="1"]