जळगाव – महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे दि.2 फेब्रुवारीपासून जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलांतील अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे.
वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी साडेनऊ वाजता जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डांगे साहेब उपस्थित राहणार आहेत