थकबाकीपोटी अमळनेर शहरातील पतपेढ्याना सील

 

अमळनेर दि.३१ जानेवारी  अखेर थकबाकीपोटी अमळनेर शहरातील पतपेढ्याना सील.

अमळनेर नगरपरिषद येथे शहरातील थकबाकी असलेल्या श्रीराज पतपेढी आशापुरी पतपेढी पूर्णवाद सहकारी पतपेढी मंगलमूर्ती पतपेढी व मैत्री प्लॉटर्सच्या दोन पतपेढी दोन मालमत्तांना आज अमळनेर नगर परिषदेच्या भरारी वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी सील लावले असून त्यामुळे थकाबाकीदार असलेल्या मालमत्ता धारकांच्या उरात धडकी भरलेली आहे
वरील पतपेढ्यांकडे सुमारे 22 लाख 50 हजाराची थकबाकी असल्यामुळे आज रोजी केलेल्या कारवाईच्या व भरारी पथकाच्या नळ कनेक्शन बंद करणे मालमत्ता सील करणे अशा कामगिरीमुळे आज रोजी पाच लाखाचा वसूल मिळालेला असून नागरिकांना अंमळनेर परिषदेकडून पुन्हा विनंती करण्यात येते की आपणाकडे असलेल्या घरपट्टी पाणीपट्टी व दुकान भाडेपोटी थकीत रकमा त्वरित भरून अमळनेर नगर परिषदेत सहकार्य करावे व आपणावर अशा जप्तीची कारवाईची कटू कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांनी केले आहे
आजची विशेष वसुली मोहीम नगरपरिषद वसुली वार्ड ५/६या भागात राबविण्यात आली आहे.

कार्यवाही झालेल्या पतपेढीवरील बाकी

● आशापुरी नागरी सहकारी पतपेढी थकबाकी 163034/-
● पूर्णवाद नागरी सहकारी पतपेढी 97574/-
● मंगलमूर्ती नागरी सहकारी पतपेढी 998343/-
● श्रीराज नागरी सहकारी पतपेढी 465450/-
● मैत्रेय प्लॉटर्स अँड डेव्हलपर्स 482416/-
● मैत्रेय प्लॉटर्स अँड डेव्हलपर्स 70056/-

[democracy id="1"]