भुसावळ तालुक्यातील महिला तलाठीला 300 रुपयाची रंगेहात लाच घेताना अटक

भुसावळ: दि.३१/०१/२०२३ रोजी मनिषा निलेश गायकवाड, वय-३८, तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ जि.जळगाव.यांना 300 लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले लाचेचे कारण –भुसावळ येथील तक्रारदार यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे इंडेक्स-२ व खरेदीखत घेऊन ७/१२ उताऱ्यावर नाव लावणेसाठीच्या विहीत अर्जासह खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ कार्यालयात अर्ज सादर केला असता तलाठी मनीषा निलेश गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडे नविन खरेदी केलेल्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठीचा अर्ज दाखल करून घेण्याच्या व ७/१२ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात तलाठी, सजा खडका व साकरी ता.भुसावळ यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ३००/-रुपये लाचेची मागणी करून सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना तलाठी कार्यालय खडका येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही सापळा पथक शशिकांत पाटील पोलीस उपअधीक्षक सहसापळा अधिकारी संजोग बच्छाव पी आय एन. एन. जाधव, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. राकेश दुसाने सदर कारवाई करणारे मदत पथक स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनील पाटील, पो.हे.कॉ. रवींद्र घुगे ,म.पो.ना. जनार्दन चौधरी ,पो.ना. किशोर महाजन ,पो. ना. सुनील वानखेडे, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ.प्रनेश ठाकूर ,पो. कॉ.अमोल सूर्यवंशी आदींनी सदर कारवाई मार्गदर्शक- मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.नरेंद्र पवार साो, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, यांच्या मार्गदर्शनाने आलोसे यांचे सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी सो भुसावळ विभाग भुसावळ, येथे यशस्वी कारवाई करण्यात आली.

[democracy id="1"]