चोपडाई येथे विशेष शिवाई श्रमसंस्कार शिबिराचे समारोप

दि.29/01/2023 रोजी क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय नवलनगर, ता.जि. धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दत्तक गाव चोपडाई येथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा.डॉ.दत्ता ढाले सर (एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालय देवपूर, धुळे) उपस्थित होते,त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी स्वयंसेवकांनवर ह्या सात दिवसाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात झालेल्या संस्कारांचं कौतुक केले व ‘युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास’ या ब्रीदवाक्याप्रमाणे स्वयंसेवक नेहमी आपल्या गावाच्या विकासात सहभाग नोंदवतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमात कोंढावळ गावाचे सरपंच माननीय भूषण पाटील व पोलीस पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.जे. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात ह्या सात दिवसाच्या विशेष शिवाय श्रमसंस्कार शिबिरात प्रमुख व्याख्यात्यांनी वेगवेगळ्या विषयांवर स्वयंसेवकांना दिलेले मार्गदर्शन व विद्यार्थी स्वयंसेवकांनी केलेले श्रमदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाला चोपडाई गावाचे सरपंच मा.भटूभाऊ भील,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि चोपडाई व कोंढावळ गावाचे ग्रामस्थ, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. संभाजी पाटील,श्री.राहुल बाविस्कर, श्री.रोहिदास पाटील,श्री.रविंद्र धनगर,श्री. संजय पवार तसेच माजी विद्यार्थी स्वयंसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.के.डी.बागुल यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.एस.डी.सूर्यवंशी यांनी केले व आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.छाया पाटील यांनी मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

[democracy id="1"]