- कार्यक्रमात, जळगाव लोकसभा खासदार मा. उन्मेश दादा पाटील यांची उपस्थिती
पारोळा प्रतिनिधी: शहरातील एकमेव सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूल येथे, खास 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा परीक्षा पे चर्चा हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.
तालकतोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथून मोदीजींनी देशातील सर्व विद्यार्थ्यांशी होणाऱ्या परीक्षा बाबत संवाद साधला. याचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी शाळेत डिजिटल पॅनलवर दाखवण्याची शाळेत व्यवस्था केली होती. यात आठवी ते दहावीच्या एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी मोदींचे थेट प्रक्षेपण ऐकले व पाहिले. प्रसंगी जळगाव लोकसभा खासदार माननीय उन्मेश दादा पाटील यांनी देखील शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन मोदीजीचा थेट प्रक्षेपण कार्यक्रम पाहिला. प्रसंगी पारोळा तालुका गटशिक्षणाधिकारी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा, शाळेचे प्राचार्य शोभा सोनी मॅडम, उपप्राचार्य कंदाळा नीरजा मॅडम तसेच सामाजिक कार्यकर्ते धीरज महाजन, सचिन गुजराती आदी उपस्थित होते. खासदार साहेबांनी बोहरा शाळेतील विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन व प्राचार्य यांनी उपस्थितीबद्दल व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने मा.खासदार
उन्मेश दादांचे आभार व्यक्त केले.