धरणगाव तालुक्यातील ग्रामसेवकास अडीच हजाराची लाच घेताना रंगेहाथ केली अटक

अंमळनेर प्रतिनिधी: धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक माहिती देण्याच्या मोबदल्यात २ हजार ५०० रुपयांची लाच घेताना  संपला
तक्रारदार हे गारखेडा येथील रहीवासी असून त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक यांचेकडे सदर ग्रामपंचायती मध्ये सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितलेली होती. सदरची माहिती ही वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना सवर माहिती देण्याच्या मोबदल्यात गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रथम ३,०००/रुपये व तडजोडीअंती २,५००/-रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.
सदर लाच मागणी केलेली रक्कम धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे पंचासमक्ष स्वतःस्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, एएसआय एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, सुरेश पाटील,सुनिल पाटील,रविंद्र घुगे, शैला धनगर,जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी आदींनी सापळा यशस्वी केला.