चोपडाई येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

दिनांक 23/01/2023 रोजी क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय नवलनगर ता.जि.धुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव चोपडाई ता.अमळनेर जि.जळगाव येथे दिनांक 23/01/2023 ते 29/01/2023 ह्या दरम्यान होत असून दिनांक 23/01/2023 रोजी विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन चोपडाई येथील जि.प.मराठी शाळा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील सैनिक मा. माधव नामदेव कांबळे यांचे वडील मा. नामदेव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात मा. नामदेव कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होत असतो.’कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.मा. कैलास महाराज चोपडाईकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,’युवाशक्ती मुळे कोणतेही सामाजिक कार्य पूर्ण करता येतो आणि ते फक्त राष्ट्रीय सेवा योजना सारख्या योजनेच्या माध्यमातून शक्य होत.’दुसरे प्रमुख मार्गदर्शक कोंढावळ गावाचे सरपंच मा.डॉ.भूषण गुलाबराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,’गावातील सामाजिक विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असते’. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.व्ही.एच.उभाळे यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व विद्यार्थ्यांचे कर्तव्य’ या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. ह्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी चोपडाई गावातील सरपंच माननीय भटू भाऊ भिल,चोपडाई कोंढावळ गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील आणि चोपडाई कोंढावळ गावातील ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा चोपडाई कोंढावळ येथील मुख्याध्यापक मा.मनोहर पाटील व सर्व शिक्षक आणि क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एस.जे.पाटील,राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.एन.झेड.पाटील,डॉ.यु.वाय.गांगुर्डे,डॉ.ए.बी.सोनवणे,क्रीडा संचालक प्रा.व्ही.बी.शिंदे,ग्रंथपाल श्रीमती सुजाता निकम,महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.छाया पाटील, प्रा.प्रमोद पाटील शिक्षकेतर कर्मचारी श्री.संभाजी पाटील,श्री.राहुल बाविस्कर,कुमारी पूनम चौधरी,श्री.योगेंद्र राजपूत,श्री.रोहिदास पाटील,श्री.रविंद्र धनगर,श्री.संजय पवार,श्री.संतोष पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी स्वागत गीत गायले आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.के.डी.बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानले तर प्रा.शिवाजी देविदास सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.