अंमळनेर येथे विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन…

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नोंदवला निषेध

आज अमळनेर येथिल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने चंद्रकांत पाटील उच्चशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या वर अनुसूचित जाती आणि जमाती अन्याय प्रतिबंध कायद्याप्रमाणे कारवाई होणे बाबत निवेदन देण्यात आले. कलम ३ (१) (१०), महापुरुष अवमान कायदा व भारतीय दंड सहिता कलम ५०६ (२) लावून कारवाई करण्यास विंनती. अमळनेर येथील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. वृत्त असे की दिनांक ०९.१२.२०२२ रोजी मौजे पैठण येथील संत पिठाच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील उच्चशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केवळ जातीय मानसिकतेतून आणि हेतुस्पर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे होते हे माहिती असून सूद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागून शाळा सुरु केल्या असे वक्तव्य भिक मागण्याची नक्कल करत म्हणजे खांद्यावर असलेल्या शालीचा पदर मागत नक्कल करून महापुरुषांचाअपमान केला आहे. सदरील चंद्रकांत पाटील यांच्या कृतीची माहिती आम्हाला सोशल मिडीया वरील त्यांचा व्हिडीओ,न्यूज चॅनलची बातमी वर पहिली आहे. म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या अश्या कृतीने समाजाच्या विषेत: नुसूचित जातीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील याचे वर अनुसूचित जाती व जमाती
अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच महापुरुष कायदा आणि भारतीय दंड संहिता याचे उल्लंघन झाले आहे. म्हणून कायदेशीर कारवाई करावी. तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोशारी हे सुध्दा वारंवार महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चुकीचा इतिहास सांगून त्यांचा अपमान करीत असतात, म्हणून त्यांची राज्यातून हाकलपट्टी करावी, अशी मागणी या निवेदना द्वारे करीत आहोत. तसे नकेल्यास या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल याच्या परिणामास आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.बहुजन क्रांती मोर्चा,सामता परिषद, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, भीम आर्मी,संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,बाब ग्रुप, मराठा सेवा संघ,भारत मुक्ती मोर्चा
व आम आदमी पार्टी यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे,या अदोलनात उपस्थित भुपेंद्र शिरसाठ,अध्यक्ष शिव प्रतिष्ठान रणजीत शिंदे,उजवला पवार, सुरेश कांबळे,समाधान मैराळे, पठाण नूरखान,प्रवीण बैसने,आत्मराम आहिरे, अविनाश खैरनार,सनी गायकवाड, दिनेश कांबळे,लयकत वायरमेन, रियाज बागवान,मनोज मोरे,सिद्धार्थ सोनवणे ,चंदू वानखेडे, रामकृष्ण देवरे, महेंद्र साळुंखे, संतोष पाटील,नाना पाटील, इमरान पठाण, गौरव सोनवणे ,राजरतन रामराजे, हितेंद्र बडगुजर, बापूराव सदाशिव,अरुण घोडके,राहुल चंदनशिव, सलीम पठाण, दर्शना पवार ,कैलास पाटील,शिवाजी ठाकरे,किरण बहारे ,दयाराम मोरे, मनोहर पाटील, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *