चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील  दुकानावर बिडी न दिल्याचा रागाने हल्ला करणाऱ्या आरोपीस झाली जन्मठेपेची शिक्षा

दुकानावर बिडी न दिल्याचा राग येऊन मानेवर केले वार आरोपीला आजन्म कारावास.

आरोपी अनिल उर्फ नानाभाऊ रामसिंग भिल



चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील  दुकानावर एकाने बिडी न दिल्याचा राग येऊन मानेवर केले वार केले त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 26 जानेवारी 2021 रोजी रात्रीच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे रात्री 8 वाजेच्या सुमारास  सुमारास देविदास दौलत कोळी यांच्या दुकानावर बिडी घेण्यासाठी फिर्यादी ज्ञानेश्वर भीमराव शिरसाट वय 45 राहणार बुधगाव हे गेले असता आरोपी अनिल उर्फ नानाभाऊ रामसिंग भिल  रा बुधगाव याने फिर्यादीकडून दारूच्या नशेत बिडी मागितली असता फिर्यादीने आरोपीला बीडी न दिल्याने अनिल भिल याने धारदार शस्त्राने मानेवर  वार करुन आरोपीला रक्तबंबाळ केले. यावेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेला तर फिर्यादी बेशुद्धावस्थेत कोसळला असता त्याला साथीदारांनी दवाखान्यात नेले.   दवाखान्यात उपचार सुरू असताना फिर्यादी शुद्धीवर आला असता. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरांचा समक्ष दिलेल्या जबाबानुसार पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान आरोपीला मानेवर ऑपरेशन करून 31 टाके टाकण्यात आले होते. या गुन्ह्यातील आरोपी अनिल रामसिंग भिल याला पोलिसांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता कारागृहात त्याची रवानगी केली होती. तेव्हापासून तो कारागृह कैदी म्हणून आजतागायत  कारागृहात आहे सदर खटला  जिल्हा न्यायाधीश पी आर चौधरी यांच्या न्यायालयात सुरू होता. सदर खटल्यात सरकारी वकील किशोर आर बागुल यांनी 7 साक्षीदार तपासले होते. जबाबात दुकानदार देविदास कोळी उपजिल्हा रुग्णालय चोपडाचे डॉक्टर सुरेश पाटील व प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार यांचा समावेश होता. या साक्षी ग्राह्य धरून बुधवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात आरोपीला कलम भा दं वि कलम 307, 326 प्रमाणे दोषी धरले यावेळी आरोपीची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला शासनामार्फत वकील देऊन खटला चालविला गेला. त्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने दंड ही नाकारण्यात आला होता. कलम 307 नुसार त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर शिक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेलमध्ये सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *