जब्बरदस्त विजय! अमळनेरच्या चि. विवेकानंद बडगुजरने नाशिकमध्येही मारली बाजी

अमळनेर तालुक्यातील संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्याथ्याने पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध करत अमळनेरचा झेंडा उंचावला आहे. या संस्थेच्या इलेक्ट्रिशियन विभागातील विद्यार्थी चि. विवेकानंद महेंद्र बडगुजर याने ‘महाकुंभ क्रीडा स्पर्धेत’ पंजा लढतीत आपल्या प्रबळ ताकदीने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
जिल्हा पातळीवर घवघवीत यश
जळगाव जिल्ह्यातील महाकुंभ क्रीडा स्पर्धा – २०२५ मध्ये पंजा लढतीसाठी चि. विवेकानंद याने कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय अतिशय शानदार प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. त्याच्या या अफाट जिद्दीमुळे तो विभागीय स्तरासाठी निवडला गेला.
नाशिकमध्येही कमाल! प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना दिली कडवी लढत
दिनांक ८ मार्च २०२५ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत चि. विवेकानंद बडगुजरने प्रचंड आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामना खेळला. अत्यंत अनुभवी आणि मजबूत प्रतिस्पर्ध्यांविरोधात त्याने जबरदस्त खेळी करत पुन्हा एकदा विजयश्री मिळवली. त्याच्या निर्धार आणि कौशल्याने प्रेक्षकांना थक्क केले आणि स्पर्धेचे वातावरण अक्षरशः भारावून टावर्षाव
अमळनेरमध्ये आनंदोत्सव, शुभेच्छांचा वर्षाव
या विजयामुळे बडगुजर परिवार, संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच संपूर्ण अमळनेरकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, प्रशिक्षक, हितचिंतक आणि पत्रकार बांधवांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!
चि. विवेकानंद बडगुजरच्या या यशाबद्दल त्याच्या कुटुंबियांसह अमळनेर आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण अमळनेरकरांकडून शुभेच्छा!
💐विजयश्री तुझ्या गळ्यात असेच राहो! पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा!









