अमळनेरमध्ये महिलांसाठी रंगणार पैठणीचा गरबा; आकर्षक बक्षिसांचीही लयलूट!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर : शारदीय नवरात्र उत्सव २०२६ निमित्त मातोश्री नगर, आर. के. नगरच्या मधून, अमळनेर येथील श्री कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिरात यंदा महिलांसाठी विशेष आकर्षण असलेली गरबा स्पर्धा व आकर्षक बक्षिसांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांचा मोठा समूह या उत्सवस्थळी एकत्र येण्याची शक्यता आहे.
नवरात्रातील प्रत्येक दिवशी महिलांसाठी गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, दररोज उत्कृष्ट गरबा सादर करणाऱ्या एका विजेत्या महिलेला आकर्षक पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये गरबा स्पर्धेबाबत विशेष उत्साह निर्माण झाला आहे.

💃 पैठणीसाठी महिलांमध्ये रंगणार चुरस!
भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम साधत महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी या गरबा स्पर्धेतून मिळणार आहे. पारंपरिक वेशभूषेत, गरब्याच्या तालावर थिरकत पैठणी जिंकण्याची संधी महिलांसाठी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे.

गरबा स्पर्धेबरोबरच उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी दररोज लकी ड्रॉ आयोजित करण्यात येणार असून, पैठणी साडी, LED टीव्ही, लेडीज सायकल, इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर, टेबल फॅन, प्रेशर कुकर, होम थिएटर, बटन मोबाईल, डिनर सेट, ग्लास गॅस शेगडी यांसह विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

🎁 रोज उपस्थित राहा, बक्षिसाची संधी मिळवा!
लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी त्या दिवसाची उत्सवस्थळी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक राहणार आहे. अनुपस्थित भाविकांना त्या दिवसाच्या लकी ड्रॉमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही. त्यामुळे महिलांसह सर्व भाविकांनी नवरात्रातील प्रत्येक दिवशी उपस्थित राहून मातेचे दर्शन, आरती आणि गरब्याचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी टोकनद्वारे १० भाग्यवान विजेत्यांची निवड करून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण नवरात्र उत्सवात दररोज मोठ्या संख्येने महिला व भाविक सहभागी होणार असून, चामुंडा माता मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणासोबतच गरब्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

“मातेचे दर्शन, गरब्याचा जल्लोष आणि पैठणी जिंकण्याची संधी” या त्रिसूत्रीमुळे यंदाचा चामुंडा माता नवरात्रोत्सव महिलांसाठी विशेष पर्व ठरणार आहे.
🙏 महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गरबा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा आणि पैठणीसह आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी साधावी, असे आवाहन श्री कुलस्वामिनी चामुंडा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०५६२७७७१
🚩🌺 जय श्री कुलस्वामिनी चामुंडा माता! 🌺🚩

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें