
अमळनेर : येथील प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजमल जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेर शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी ही नियुक्ती केली. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाश जैन यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष चेतन राजपूत, कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस संदीप जैन, निलेश महाजन, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकाश जैन हे अमळनेर शहरातील प्रसिद्ध महावीर आईस्क्रीमचे संचालक असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शहरातील व्यापारी बांधवांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचवून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.








