जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांचा त्रिराज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बडगुजर समाजाच्या इतिहासात प्रथमच भव्य उपक्रम; 60 हून अधिक पोलीस व कुटुंबियांची उपस्थिती

जळगाव,अटकाव न्यूज  : हितेंद्र बडगुजर
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने बडगुजर समाज सरस्वती मिशन व नवोदय युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिराज्यस्तरीय पोलीस सन्मान सोहळा दि. 23 मार्च 2026 रोजी महाबळ रोड, मायादेवी नगर येथील रोटरी हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बडगुजर समाजाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या सोहळ्यात सुमारे 60 पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या धैर्य, समर्पण व कर्तव्यनिष्ठेचा गौरव यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अनिल दि. नंदवाळकर, भास्कर पितांबरशेठ बडगुजर, हरी गिरधरशेठ बडगुजर, प्रदीपशेठ बडगुजर, रंगराव नाना बडगुजर व सुधीरभाऊ बडगुजर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करताना कठीण प्रसंगांना सामोरे जाताना दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. “समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सन्मान मिळाल्याचा आनंद आहे,” अशा भावना अनेक पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
सरस्वती मिशन संस्थेच्या वतीने यापूर्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवोदय युवा मंचतर्फे विविध गावांमध्ये जाऊन विद्यार्थी सन्मान, स्त्री जन्माचे स्वागत, जेष्ठ नागरिकांना काठी वाटप यांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत. नवोदय युवा मंचच्या संकल्पनेतून बडगुजर समाजात प्रथमच सावित्रीबाई फुले महिला सन्मान सोहळा, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव तसेच मरणोत्तर सन्मान सोहळ्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही संस्था समाजातील सर्वाधिक उपक्रम राबविणाऱ्या व लोकप्रिय ठरल्या आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक येथील नवोदय युवा मंचचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम बडगुजर, जळगाव येथील विकासशेठ बडगुजर, संजय जगन्नाथ बडगुजर, दिलीप बडगुजर, प्रा. अविनाश बडगुजर, भास्कर बडगुजर, हेमचंद्र बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सरस्वती मिशनचे मुकेश बडगुजर, प्रा. शांताराम बडगुजर, ज्ञानेश्वर बडगुजर, अतुल बडगुजर, जयवंत बडगुजर, निरंजन बडगुजर आणि नवोदय युवा मंचचे अमितभाऊ बडगुजर, प्रदीप बडगुजर यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी खान्देशातील पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद ठेवण्यात आला होता. बट्टी, वरण-भात, वांग्याची भाजी आणि जलेबी यांचा मनमुराद आस्वाद घेत सर्वांनी आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें