जैतपीर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे उद्घाटन

आ.अनिल पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ

अमळनेर-मतदारसंघात आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने कुठे विलासकामांचे भूमिपूजन तर कुठे लोकार्पण व उद्घाटन सतत सुरू असून यामुळे मतदारसंघात विकासाचा आलेख उंचावत असल्याचे दिसत आहे.
अमळनेर तालुक्यातील मौजे जैतपीर 60 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास काम उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.विकास कामाच्या निमित्ताने गावात आलेल्या आमदारांचे ग्रामस्थानी जल्लोषात स्वागत करून सत्कार केला.आमदारांनी आपल्या मनोगतात मतदारसंघात सुरू असलेल्या विकासाचा आराखडा मांडून प्रत्येक गावाचा विकास हेच आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी आधार फाउंडेशन अमळनेर चे अध्यक्ष अशोक आधार पाटील, आत्मा कमिटी अध्यक्ष सुनील पवार यांच्या सह सरपंच महेंद्र पंडीत पाटील, उपसरपंच साहेबराव भिकन देशमुख, मा.सरपंच संजय शिवराम सोनवणे, मा.सरपंच निलेश शिवाजी बागूल, कोमल सुकलाल पाटील, अजबसिंग गुलाबसिंग पाटील, नेहरू विठ्ठल पाटील, आजाब वामन पाटील, सुषमा पुंजु पाटील, योगेश हिरामण भिल, नारायण लोटन धनगर, नागो सुरेश पाटील, समाधान पाटील, अनिल लोटन पाटील, विजय जयसिंग पाटील, दत्तात्रय कृष्णा पाटील, धनंजय नवल पाटील, भास्कर सदाशिव चौधरी, उमाकांत अशोक पाटील, विलास बारकु पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते..!

या विकास कामांचे झाले उद्घाटन,,जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना रक्कम 60.41 लक्ष, डी.पी.सी. अंतर्गत नवीन अंगणवाडी बांधकाम रक्कम 11.85 लक्ष, तलाठी कार्यालय बांधकाम रक्कम 25.00 लक्ष एकूण रक्कम- 97.26 लक्षच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.