अमळनेर, माजी गटशिक्षणाधिकारी धरणगाव व शिक्षण विस्तार अधिकारी पं.स अमळनेर तथा शिरूड गावाचे रहिवासी अशोक दामू बिऱ्हाडे यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती व युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 डिसेंबर 2022 रोजी नांदेडकर सभागृह हॉलमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मा. विश्वास पाटील (गटशिक्षणाधिकारी, अमळनेर) हे अध्यक्षस्थानी होते. ते बोलताना म्हणाले की, बि-हाडे साहेब हे एक हृदयाने माणसं जोडणारा माणूस! या माणसाने तालुकाचं नव्हे तर महाराष्ट्रभर संघटनेचे जाळे विणले आहे, एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पंचायत राज कमिटीने त्यांची दखल घेत अभिनंदनचा ठराव पास केला होता ,आपल्या वैचारिक मार्गदर्शनाने माणसे उभी करणारा मार्गदर्शक म्हणून बि-हाडे साहेबांना जिल्हाभरात ओळखले जाते असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बि-हाडे साहेबांच्या जीवनपटावर आधारित सुंदर असा विशेषांक संपादक अजय भामरे, उपसंपादक सोपान भवरे व अतिथी संपादक मिलिंद निकम यासह लेखन मंच परिवाराने मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला.श्री.दिलीप महाजन सर यांनी सुंदर महाराष्ट्र गीताचे गायन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.अशोक पवार म्हणाले की, एका कामगाराच्या मुलाचा शिक्षक ते अधिकारी असा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांनी सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी चळवळीला वाहून घेतले आहे.असे हे धुरंधर कर्मयोगी आहेत,असा त्यांनी त्यांच्या भाषणातून उल्लेख केला.तसेच सुदाम महाजन (मा.तहसिलदार),प्रा.सुभाष पाटील,पी डी पाटील, बन्सीलाल भागवत, विनोद मोरे,श्याम अहिरे (माजी सभापती) कैलास पवार ,शरद सोनवणे, जी.टी टाक, प्रज्ञा शिरूरकर ,सौ. रत्नप्रभा बि-हाडे, डॉ. राहुल निकम, दत्तात्रय सोनवणे यासह आदी मान्यवरांनी साहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती बि-हाडे साहेबांनी आपलं बालपण ते सेवानिवृत्ती प्रवास मांडला. त्यांना लहानपणापासून वाचनाची गोडी होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खैरमोडे, कांबळे यांच्या वैचारिक खंडाने ते प्रभावित झाले. यावरून त्यांनी स्वतःला परिवर्तनाच्या चळवळीला वाहून घेतले.या पुढेही सामाजिक चळवळीला योगदान देण्याचे स्पष्ट केले. सर्व हितचिंतकांनी कार्यक्रम घडवुन आणला.त्यांचा मी ऋणी राहील, असे शेवटी बोलताना भाव व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी एच.डी देशमुख , साहित्यिक गोकुळ बागुल, प्रा.विजय वाघमारे ,चिंधु वानखेडे, रणजीत शिंदे, डी.ए सोनवणे ,वाल्मीक पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, सुरेश गोसावी ,प्रा.उल्हास मोरे, सुनील पाटील, एस. पी .वाघ रामकृष्ण महाजन ,रवींद्र चव्हाण, पुरुषोत्तम माळी, दर्शना पवार, डी. एस धनगर, भिका दादा बि-हाडे, प्रा, विजय गाढे, दिलीप पाटील, दिलीप महाजन, नंदलाल बैसाणे, ज्ञानेश्वर पाटील ,प्रा. शिवाजी पाटील ,शेख ऐनउद्दीन सय्यद हसन,शेख निजामुद्दीन ,महेश पाटील, यशवंत बैसाणे या शैक्षणीक/ सामाजिक/ राजकीय/ शासकीय व अन्य क्षेत्रातील विविध मान्यवर पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन अशोक पाटील सर आभार प्रदर्शन प्रा.विश्वास पाटील यांनी मांनले.