शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी राज्य सरकार दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देत असते. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक तयार करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन पेपरचे सादरीकरण व प्रकाशन झालेले आहेत राज्यस्तरीय शिक्षण संक्रमणमध्ये लेख प्रकाशित झालेत तसेच महाराष्ट्र शासनाची पाच पुस्तकांचे प्रकाशनही झाले. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. एकूण पाच पुस्तके प्रकाशित, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभाग, स्वच्छता अभियानाअंतर्गत जागर स्वच्छतेचा या पथनाट्याचे सादरीकरण, राज्य स्तरीय शिक्षण परिषदेत सहभाग, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा पुरस्कार, राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक, भूगोल व शिक्षणशास्त्र विषयाचा इयत्ता11 वी व 12 वी चा 100 टक्के निकाल, विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम वाचन कट्ट्याची स्थापना, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती तसेच त्याठिकाणी विवीध समित्यांवर कार्य, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे अभ्यासक्रम विकासनाचे कार्य, निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी, याआधी कोरोना योद्धा पुरस्कार, राष्ट्रीय कार्य पल्स पोलियो मोहिमेत सहभागी, वृक्षारोपण, स्वच्छता अभियानात विशेष उल्लेखनीय कार्य, ट्री गार्ड भेट, विद्यार्थ्यांना अंबुलन्स कार्याविषयी माहिती, मुलींच्या समस्यासाठी व्याख्यानांचे आयोजन, वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन विविध प्रकारचे कार्य केले. बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी बचत, एडस दिवस, रुफ वॉटर हार्वेस्टिंग, गॅस वापर, गांडूळ खत प्रकल्प, गणपती दान उपक्रमात गणपतीच्या मूर्तींपासून खत निर्मिती प्रकल्प यामध्ये भरीव कार्य केलेले आहे.
या सर्व कार्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाचा 2022 चा थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारने डॉ. वंदना पाटील यांना गौरविण्यात येणार आहे.
राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार काकसो वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी तथा संचालक मा. दादासो रोहन मोरे, प्राचार्य आण्णासो डी. आर. पाटील, उपप्राचार्य एस. भावसार तसेच सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी सर्वानी अभिनंदन केले तसेच त्यांचे अमळनेर येथील व अख्या महाराष्ट्रातील मित्रपरिवार, नातेवाईक सर्वच स्तरावरून मोठ्याप्रमाणात अभिनंदन होत आहे.
डॉ. वंदना एस. पाटील, उपप्राचार्य
M. A., M. Ed. Ph. D.
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा.