शिक्षक डी
.ए
.धनगर यांच्या संकल्पनेतून
गणित दिवस साजरा
साने गुरुजी विद्यालयात चालता बोलता ची धमाल साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे गणिती चालता बोलता कार्यक्रमाने गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिव संदीप घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुनील पाटील उपस्थित होते. गणिती चालता बोलता कार्यक्रमाचे आयोजन गणित शिक्षक डी ए धनगर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. सदर प्रसंगी प्रत्येक तुकडी चा एक गट याप्रमाणे शाळेतील वेगवेगळ्या वर्गांच्या तुकडीनुसार विभाजन करण्यात आले होते. विशिष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी शिक्षक समाधान पाटील, हर्षल पवार व जयेश मासरे यांनी परिश्रम घेतले. प्रत्येक वर्गाला गणिताचे प्रश्न विचारून गणिताविषयी मनातील भीती व विद्यार्थ्यांमधली न्यूनगंडता काढण्यासाठी उपयुक्त ठरले. सलग तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. क्षणोक्षणी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. चुकीची उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हशा सुद्धा झाला. तसेच बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप आपल्या सवंगडींनी दिली. या गणिती चालता बोलता कार्यक्रमात यशोदीप दीपक पवार, अजिंक्य प्रवीण सोनवणे, डीकेश संजय विसपुते बक्षीस पात्र ठरले. यावेळी वेदांत प्रताप सिंग राजपूत या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत दिलीप पाटील यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी मनोगत सांगितले की, गणित हा विषय आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. तो प्रत्येकाने आत्मसात केला तर जीवनाची उन्नती शक्य आहे. संदीप घोरपडे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गणित हे सर्वव्यापी आहे त्यामुळे त्याचा सर्वत्र वावर आपल्याला दिसून येतो. दशमान मांडणी ही जगाला देणगी भारतीयांनी दिली त्यामुळे गणिताचा प्रचार आणि प्रसार आपल्याकडून झाला पाहिजे. असेच दर्जेदार कार्यक्रम घडवून गणित जागृती वाढवली पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अरुण पाटील, देवेंद्र पाटील, विद्या पाटील, शारदा उंबरकर,मीना धनगर, दीपक मोरे, देवेंद्र महाजन, नंदकुमार निकम, यशोदा महाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी तर आभार प्रदर्शन जे एस पाटील यांनी केले.