पोलिसांचा रूट मार्च, मतदान प्रक्रियेत उपद्रव करणाऱ्या लोकांवर बसली दहशत.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी याकरिता संबंधित गावात पोलिसांचा रूट मार्च .. पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे.

अमळनेर :आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रिये निमित्ताने पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, अमळनेर पोलिस स्टेशन यांनी यापूर्वीच बंदोबस्ताचे सुसज्ज असे नियोजन केले आहे.
तसेच यापूर्वीच ग्रामपंचात निवडणुक अनुषंगाने संवेदनशील गावांना भेटी देणे, तेथील ग्रामस्थांच्या बैठका घेणे, त्यांना आदर्श आचासंहिते बाबत माहिती देऊन त्याचे पालन करणेबाबत सूचीत करणे बाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. तसेच गावातील उपद्रवी लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
आज मतदानाच्या दिवशी देखील सुंदरपट्टी नगाव बुद्रुक, हेडावे, जानवे व इतर गावांना मतदान केंद्रांवर भेटी देणे सतत चालू असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवा याकरिता संबंधित गावात पोलिसांचा रूट मार्च घेण्यात येत आहे.
या सर्व गोष्टींमुळे उपद्रवी लोकांवर पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.

तसेच निवडणूक निमित्ताने काही गैरप्रकार होत असल्यास तात्काळ अमळनेर पोलिसांना कळवावे, तात्काळ मदत मिळेल असे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगीतले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]