दिनांक १२/१२/२०२२ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव , क्रीडा परिषद जळगाव आयोजित शासकीय शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे संपन्न झाल्या. . यामध्ये जळगाव जिल्ह्यातील१५ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . या स्पर्धेत १४ वर्षाआतील ( मुले )उंच उडी प्रकारात आमच्या विदयालयातील जयेश धनगर यांची नाशिक येथे होणाऱ्या विभागिय स्पर्धेसाठी निवड झाली असुन या खेळाडूस जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मिलिद दिक्षित साहेब ,राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री मिनल थोरात साहेब , तालुका क्रीडा अधिकारी श्री.जगदिश चौधरी साहेब , जळगाव जिल्हा अॕथलेटिक्स सचिव प्रा. राजेश जाधव सर , मुख्याध्यापक श्री. डी एच ठाकुर सर , उपमुख्याध्यापक श्री. आर एल माळी सर पर्यवेक्षक श्री.सी एस पाटील सर , पर्यवेक्षक श्री.एस बी निकम सर, जेष्ठशिक्षकश्री. ए डि भदाणे , श्री,सी एस सोनजे ,श्री.एस आर शिंगणे यांनी बुके देऊन अभिनंदन केले व पुढिल स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.अमळनेर तालुका क्रीडाअध्यक्ष व शाळेचे क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त श्री एस पी वाघ सर, श्री. के आर बाविस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.