पोलीस कर्मचारी राहुल चव्हाण यांनी जपली माणुसकी

अमळनेर दि. 16 :- अमळनेर पोलीस
स्थानकात कार्यरत असणाऱ्या पोलीस
कॉन्स्टेबल ला रात्री घरी जातांना एक
पिशवी सापडली होती. दुसऱ्या दिवशी पिशवी
हरविल्याची तक्रार दाखल करण्यासाठी
आलेल्या मूळ मालकाला खात्री करून बॅग
परत केल्याने प्रामाणिक पोलिसांचे सर्वत्र
कौतुक होत आहे.
अमळनेर पोलिस स्टेशन चे पोलिस
अंमलदार राहुल दिलीप चव्हाण हे आपले
नियमित कर्तव्य बजावून अमळनेर येथून
दि.14 रोजी रात्री पारोळा येथे घरी जात
असताना अचानक रात्री 9 वाजता पाऊस
चालू झाल्याने राहुल चव्हाण हे बहादरवाडी
फाटा थांबावर थांबले असता त्यांना तेथे
उभे असलेले रवींद्र धुळाराम लांबोळे वय
56 वर्ष, धंदा न पा. पारोळा कर्मचारी
रा. पाटील कॉलनी अमळनेर हे बॅग विसरून
निघून गेले सदरची बॅग पो.कॉ.राहुल चव्हाण
यांनी ताब्यात घेऊन तसे पोलिस स्टेशन ला
कळवून बॅग सोबत घरी घेऊन गेले. बॅग चे
मूळ मालक दि. 15 रोजी पोलिस स्टेशनला
बॅग हरवली बाबत तक्रार देण्यासाठी आले
तेव्हा सदरची बॅग पो. कॉ. राहुल चव्हाण
ड्युटीला येत असताना सोबत घेऊन आले व
त्यांना बॅग मध्ये

महत्त्वाचे सरकारी कागदपत्र, रोख रक्कम 7
हजार रुपये असा मुद्देमाल होता त्याची खात्री
करून बॅग मालकास परत करण्यात आली
आहे त्याबाबत बॅग मालक रवींद्र धुळाराम
लांबोळे यांनी पोलिस अंमलदार राहुल
चव्हाण यांचे खूप खूप आभार मानले राहुल
चव्हाण यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र
कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]