सरकारी कार्यालयांमधील पार्किंग सुविधेसाठी आकारले जाणारे माफक ५ ते १० रुपयांचे शुल्क द्यायचे आपण टाळतो. मात्र, या पार्किंगसाठी पैसे देणाऱ्या व त्याची पावती बाळगणाऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यालयातील पार्किंगच्या जागेवरून एकाची मोटारसायकल चोरीला गेली. या चोरीची नुकसान भरपाई पार्किंग व्यवस्थापनाने द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत असे एका प्रकरणात समोर आले आहे.
आपण मोटारसायकल पार्किंग परिसरात लावली व त्यासाठी त्यांना शुल्कही अदा केले. त्याबदल्यात त्यांना पावती मिळाली. ‘हॅण्डल लॉक करू नका’, असे आपल्याला पार्किंग व्यवस्था सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. तर वाहन सांभाळण्याची सपूर्ण जबाबदारी हि त्या व्यवस्थापनावर येते. त्यानुसार आपण वाहनाला कुलूप लावले नाही. काम आटोपून वाहन ठेवलेल्या ठिकाणावर गेल्यावर वाहन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यास पार्किंग व्यवस्थापनाकडून फारसा प्रतिसाद आपल्याला न मिळाल्याने याबाबत आपण
सदर पोलिसांत तक्रार द्यावी. तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगातही धाव याबाबत तक्रार द्यावी
आपण पार्किंगचे शुल्क दिले तर अशात आपल्या वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा पार्किंग व्यवस्थापनाने घ्यायला हवी. व्यवस्थापन ही पार्किंग व्यवस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविते. अशात त्यांनी नुकसान भरपाई देणे अपेक्षित नसल्याचा काही संघटनेचा दावा असतो . मात्र, पार्किंगचे शुल्क आकारल्यास त्या वाहनाच्या सुरक्षेचीही जबाबदारीही पार्किंग व्यवस्थापनानेच घ्यावी, एवढी एकच आशा …. फक्त ग्राहकांना जागरूक करण्यासाठी ….