अंमळनेर अटकाव न्यूज
जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या
निवडणुकीत अमळनेर सोसायटी मतदारसंघातून
आमदार अनिल पाटील यांनी विजय संपादीत केला
असून या माध्यमातून सहकार पॅनलला अजून एका
जागेवर यश लाभले आहे.
जिल्हा दुघ संघाच्या निवडणुकीत अमळनेर
सोसायटी मतदारसंघातून आमदार अनिल पाटील
आणि माजी आमदार स्मीताताई वाघ यांच्यात लढत
होती. आधीच्या कार्यकारिणीत स्व. उदय वाघ हे
निवडून आले होते. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या
भैरवीताई पलांडे यांना संचालक म्हणून संधी
मिळाली होती. दरम्यान, यंदा आजी-माजी आमदार
जोरदार लढत झाली.
या लढतीमध्ये आमदार अनिल भाईदास पाटील
यांनी विजय मिळविला आहे. त्यांना २४६ मते
मिळाली असून स्मिताताई वाघ यांना १८४ मते
मिळाली. यातून त्यांचा विजय निश्चीत झाला आहे. म्हणून अंमळनेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाकेच्या आतिशबाजीत जल्लोषात आनंद व्यक्त केला