तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दादू धोबी ला अमळनेर पोलिसांकडून अटक

अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना गुप्त माहिती द्वारा बातमी मिळाली की शहरातील जुना पारधी वाडा भागात राहणारा राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ हा शहरातील सुभाष चौक भागात हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवीत फिरत आहे त्यावरून पो. हे.कॉ. कपिल देव पाटील पो.ना. मिलिंद भामरे यांना पो.ना. लक्ष्मीकांत शिंपी पो.ना. सूर्यकांत साळुंखे यांना सदर इसमास ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या.   त्याप्रमाणे पथकाने राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ याच्या शोध घेत असताना पटेल कॉम्प्लेक्स जवळील बोळीमध्ये एक इसम हातात तलवार घेऊन दहशत माजवीत फिरत असताना दिसला तेव्हा त्याला पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले तेव्हा दादू धोबी च्या जवळ एक धारदार पात्याची स्टीलची तलवार व एक लाकडी मोठा चाकू असे साहित्य मिळून आले सदरील इसमाचे नाव राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ राहणार जुना पारधी वाडा अंमळनेर असे असून पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 566/2022 शस्त्र अधिनियमन 1959 चे कलम 4/25 सह मु.पो.का.क्र.135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत सदर अटक झालेल्या आरोपीच्या पूर्वीच्या इतिहास पाहता तो अंमळनेर पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अधीक्षक श्री एस राजकुमार सो मा.अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो. उपविभागीय अधिकारी राकेश जाधव सो. यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पो.हे.का.कपिलदेव पाटील,पो.ना.मिलिंद भामरे,पो.ना. लक्ष्मीकांत शिंपी,पो.ना.सूर्यकांत साळुंखे या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]