अमळनेर तालुक्यातील दोधवद येथे शेतीच्या बांधावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य विरोधात मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे फिर्यादी जितेंद्र नथू करंदीकर राहणार दोधवद हल्ली मुक्काम अमळनेर याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दोधवद येथे शेतात ट्रॅक्टर द्वारे शेतीचे काम सुरू असताना शेजारील शेताच्या मालक विनायक राजाराम पाटील यांनी ट्रॅक्टर चालकास जॉब विचारला असता फिर्यादीस काठीने पाठीवर डोक्यावर मारहाण करत शिवीगाळ करून जिवंत ठेवणार नाही असे सांगत जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर मुका मार लागल्यामुळे वैद्यकीय उपचार घेत असल्याने तसेच मुलीची तब्येत खराब असल्याने फिर्याद देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्यावरून विनायक राजाराम पाटील यांच्यावर भादवी कलम 324 504 506 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत