अमळनेर शहरात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा १२ डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक

अमळनेर शहरात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा १२ डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक

अमळनेर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेर शहरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून या निमित्ताने खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक तथा भव्य राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 डिसेंबर पासून अंमळण्यात करण्यात आले आहे अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रताप महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून याची जाहिरात तयारी आयोजकांकडून सुरू झालेली आहे या स्पर्धेचे प्रथम बक्षीस एक लाख 11 हजार 111 रुपये तर द्वितीय बक्षीस 55 हजार 555 रुपये असणार आहे या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज साठी 1111 आणि उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट फिल्डर व उत्कृष्ट कीपर यांना देखील आमदार चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी आठ हजार रुपये असून सदर स्पर्धेत राज्यभरातील जवळपास 32 नामांकित संघ सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे या संघाच्या माध्यमातून काही महाराष्ट्र रणजी गुजरात रणजी व मध्य प्रदेश रणजी खेळलेले खेळाडू देखील दाखल होणार आहे असल्याने त्यांच्या क्रिकेट खेळ शौकिनांना पाहायला मिळणार आहे प्रत्येकी 20 वर सामने होणार आहेत

12 डिसेंबरला होणार  उद्घाटन    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]