मंत्री अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत हे शरदचंद्र पवार यांचे शब्द खरे करणार !!! उमेश पाटील यांनी व्यक्त केल्या भावना.!!!

अमळनेर :  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल शिंदे हे उच्चविद्या भूषित असे उमेदवार असुन.उत्तर महाराष्ट्रातील एकमेव नामांकित सर्जन व गोरगरिबांची परिस्थितीची जाण असणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉ अनिल शिंदे हे अतिशय सरळ,सोज्वळ, मनात कोणतेही डावपेच नाही असा त्यांचा स्वभाव गुण आहे. अगदी स्पष्ट बोलणे ही त्यांची ओळख आहे.
मात्र जनता हि मंत्री अनिल पाटील यांना कंटाळलेली असुन मतदारांना नवीन पर्याय हवा आहे म्हणून जनता आजी व माजी दोन्ही आमदारांना नाकारणार आहे. व आपल्या सर्वांच्या परिचयाचे आपल्या संपुर्ण अमळनेर विधानसभा मतदारसंघातील समस्या ज्यांना संपुर्ण माहिती आहे. सुशिक्षित आणि खरे आणि स्पष्ट बोलणारे डॉ अनिल शिंदे यांना पर्याय म्हणून लोक बघत आहेत.
विधानसभा मतदारसंघाची तसेच गोरगरिबांची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. डॉ अनिल शिंदे यांनी निवडणूका जाहिरात होण्यापूर्वीच आधी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रत्येक समस्याची जाण डॉ अनिल शिंदे यांना असुन त्या सर्व समस्या वर मार्ग काढायचा असेल तर त्यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. असे नम्र आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे.
डॉ अनिल शिंदे यांचा हा अमळनेर विधानसभेचा दुसरा दौरा असुन त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक मतदारांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या आहेत.त्यामुळे त्यांना जनतेचा वाढता पाठींबा दिसुन येत आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत शरदचंद्र पवार यांनी मंत्री अनिल पाटील हे पुन्हा निवडुन येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे मत व्यक्त केले होते. म्हणून आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा शब्द आम्हाला खरा करण्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रंचड मेहनत घेत आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गटाचे) तसेच शिवसेना (उबाठा) काँग्रेस पक्ष व शरदचंद्र पवार यांना मानणारा अमळनेर विधानसभा मतदारसंघात मोठा मतदार वर्ग आहे. म्हणून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *