
अमळनेर: दि. 10-11-2024 रोजी अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात Reflection – Rotary District Public Image Seminar चे आयोजन करण्यात आले.
यात रोटरी क्लब जळगाव, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव व पाचोरा-भडगाव येथील 110 रोटरी सभासदांनी सहभाग नोदवला. या सेमिनार चा प्रमुख उद्देश समाज उपयोगी केलेली कामे ते जनते समोर विवीध माध्यमाद्वारे मांडणे किती व कसे गरजेचे आहे, समाज उपयोगी कामे करतांना रोटरीचे ईमेज कशी जोपासली पाहीजे व असे अनेक मुद्यावर चर्चा करण्यात आली.
यासाठी बडोद्याहुन पिडीजी पिंकी पटेल व पिडीजी राजीव शर्मा, जळगावहुन डिजीएन डाॅ राजेश पाटील, माळेगावहुन पिडीजी राजेंद्र भामरे ह्यांची प्रमुख उपस्थितीत लाभली.
तसेच प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक रो.डाॅ.दिलीप भावसार हे देखील मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी पिडीजी पिंकी पटेल यांनी त्यांचा अनुभव कथन करत पब्लिक इमेज किती महत्वाची आहे हे सांगीतले. उदघाटन सोहळा, दोन प्लेनरी सेशन, समारोप सोहळा असा हा सेमिनार विभागला गेला.
पब्लिक ईमेज या पहिल्या प्लेनरी सेशन मध्ये रो.सागर मुंदडा, रो.प्रतिक जैन , रो. संजय शाह, रो.नितीन अहिरराव , रो.रमण जाजू , रो.अॕड. सागर चित्रे यांनी सहभाग घेतला. या सेशनमधून आपापल्या क्लबमध्ये उत्तम काम करुन रोटरीची जनमानसात उज्वल प्रतिमा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूर निघाला. या सेशनचे संचालन डिजीएन रो.डाॕ.राजेश पाटील यांनी केले.
मिडीया मॕनेजमेंट आॕफ रोटरी क्लब या विषयावर GML च्या संपादीका रो.स्वाती डहाके यांनी मार्गदर्शन करतांना पब्लिक इमेज चेअरमनचे सविस्तर कार्य ही विशद केले. रोटरीमध्ये पब्लिक ईमेजचे महत्त्व या विषयावर जाँईंट डिस्टिक्ट सेक्रेटरी रो. अॕड. सुरज चौधरी यांनी माहिती दिली. रोटरी वरील असलेल्या विश्वासाशिवाय पब्लिक ईमेज बनू शकत नसल्याचे सांगितले. सभासदांसोबतच इतर सामान्य अमळनेरकर ही उपस्थित राहणे , आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले._
_पब्लिक ब्रॕडींग या दुसऱ्या प्लेनरी सेशन चर्चासत्रा मध्ये आपल्या क्लबची ब्रॕडींग यात रोटरी पब्लिक ईमेज झोन 4 च्या को- आॕर्डीनेटर PDG पिंकी पटेल, रो.अपर्णा मकासरे , रो.चंदुभाई सात्रा , रो.विलास पाटील , रो.आधार महाले , रो.सुनिल सुखवानी , रो.विनीत जोशी यांनी सहभाग घेतला. चांगल्या कामांनी – प्रोजेक्टनी आपण आपल्या क्लबसह रोटरीची ईमेज आणि ब्रॕडींग वाढवित असतो. आपण सभासदच रोटरीचे ब्रॕण्ड अॕम्बेसेडर आहोत असा सूर या चर्चासत्रातून निघाला.या चर्चासत्राचे संचालन EMGA PDG रो.राजीव शर्मा यांनी केले.
सेमिनार नंतर सर्वासाठी भोजन व्यवस्था केली होती.
सेमीनार यशस्वी होण्यासाठी अमळनेर क्लबचे प्रेसिडेंट रो.ताहा बुकवाला , मानद सचिव रो.विशाल शर्मा , कन्व्हेनर रो.प्रितपाल सिंग बग्गा , को-कन्व्हेनर रोनक संकलेचा यांच्यासह क्लब सभासदांनी विशेष परिश्रम घेतले यात रो. वृषभ पारख, रो. रोहीत सिंघवी, रो. सौरभ जैन, रो.देवेंद्र कोठारी, रो. प्रतिक जैन, रो. सुहास राणे, रो. चेलाराम सैनानी, रो. डॉ दिलीप भावसार रो.प्रदीप पारख ,रो.डॉ अनिल वाणी, रो.विनोद जैन,रो .अविनाश अमृतकर रो.निलेश जैन ,रो. महेश पाटील, रो.विवेक देशमुख,रो. मकसूद बोहरी, रो.कीर्तीकुमार कोठारी,रो. राजेश जैन, रो. डॉ राहुल मुठ्ठे, रो. लालचंद सैनानी,रो. डॉ. कौस्तुभ ठाकूर, रो. विजय पाटील, रो. नीलेश पाटिल, रो. आशिष चौधरी, रो. सतीश खंडेरीया, रो. एड.गोपाल सोनवणे, रो. योगेश येवले व इतर रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते.
आभार रो.सुरज चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन रो.अभिजीत भांडारकर व रो. देवांग शहा यांनी केले.
