मंगळ ग्रह मंदिर व्यावसायिक संघटनेचा अनिलदादा यांना पाठिंबा!

नारळपूजा, फोटो व किरकोळ ब
विक्रेत्यासह रिक्षा चालकांचे समर्थन!!

अमळनेर : येथील जगप्रसिद्ध मंगळदेव ग्रह मंदिर परिसरात दोनशे ते अडीचशे विविध व्यावसायिक पोट भरतात, कुणी नारळ विक्री करतो कुणी पूजा साहित्य, कुणी खाद्य पदार्थ तर खेळणी व रिक्षा चालक देखील आहेत.
या सर्वानी एकमुखाने ठराव करीत विधानसभा निवडणूकीचे उमेदवार अनिलदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यांचे विजयासाठी परिवारासह आवाहन करण्यात आले आहे.
काल मंगळदेव ग्रह मंदिर परिसरातील सर्व व्यावसायिकांची बैठक झाली त्यात विकासकाम करणारे भूमिपुत्र अनिलदादा यांचे पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]