अमळनेर तालुख्यातील पाडळसरे धरण बाबत लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत-डॉ अनिल शिंदे

अमळनेर : तालुक्यातील पाडळसरे धरण हा विषय दर निवडणुकीच्या वेळी चर्चेला येतो. तालुक्याचा ज्वलंत विषय म्हणजे पाडळसरे धरण होय,निवडणूक तोंडावर आल्याने या धरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत असल्याचे काँग्रेसचे नेते व विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.आणि हे पत्रक सोशल मीडियावर खुप चर्चेत आहे
याबाबत सविस्तर असे की,पाडळसरे धारणाचा जुमला अमळनेरचे जुमलेबाज लोकप्रतिनिधी केंद्र सरकारच्या जुमल्यावर करीत आहेत. खरं तर त्यांना गुजरातला पाणी कमी पडू नये म्हणून ते भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेले विद्यमान लोकप्रतिनिधी अमळनेर शहरात व तालुक्यात होल्डिंग्ज लावून अमळनेर तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत असल्याची टिका या पत्रकात डॉ. अनिल शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]