अमळनेर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दि. 28 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार ,अंमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने आज दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी 11. 00 वाजता, अमळनेर येथे, महाराणा प्रताप चौकात, सरकारच्या प्रतिमेस “जोडे मारो” आंदोलन केले गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवणीच्या राजकोट किल्ल्यावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. तरीही निकृष्ट बांधकामामुळे, पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याचे बांधकामात देखील या युती सरकारने भ्रष्टाचार केला. राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकडला आहे. कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू आहे. राज्यात शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून, प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या भाजप सरकारने, युती सरकारने महाराजां चा मोठा अवमान केला आहे. या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने “जोडे मारो” आंदोलन पुकारलेले आहे. व सदरचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या माध्यमातून राबविण्यात आला. त्यावेळी आबासो डॉ. बी. एस. पाटील, सौ. सुलोचना वाघ, के. डी. पाटील, संदीप घोरपडे, प्रशांत निकम, बी.के सूर्यवंशी, मनोज पाटील श्याम जयवंतराव पाटील, गोकुळ बोरसे, डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, धनगर पाटील, चंद्रशेखर भावसार, राजू दादा फापोरेकर, भागवत गुरुजी, प्रवीण जैन, प्रा. श्याम पवार, प्रताप पाटील, दिलीप भाऊसाहेब, मनोहर पाटील, शरद पाटील, पी वाय पाटील, प्रवीण देशमुख, रज्जाक शेख, कन्हैयालाल कापडे, डॉ.रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेश पाटील, राहुल गिरासे, विवेक पाटील, तहसील तेली, कुणाल चौधरी, जयेश पाटील, राहुल पाटील, सनी पाटील, इंद्रस बागवान, असे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ. बी. एस. पाटील यांच्या भाषणाने झाला.