मंगरूळ येथे बघण्यावरून दोघांत झाली तुफान हाणामारी

याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे बघण्यावरून दोघांवर आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची घटना २८ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जिनगर गल्ली मधील कामील हुसेन खाटीक व कलीम यासीन खाटीक हे मंगरूळ येथे खाटीकचा व्यवसाय करतात. २८ रोजी या दोघांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात कामील याला आठ ते दहा जणांनी हल्ला केला. त्यात कामील याला पोटाला , हाताला व डोक्याला मार लागला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.तर कलीम याला मुक्का मार लागला असल्याचे समजते.घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पो कॉ कैलास शिंदे, अमोल पाटील, जितेंद्र,निकुंभे, सागर साळुंखे, संदेश महाजन, होमगार्ड पूनम हटकर याना घटनास्थळी पाठवले. दरम्यान मारणारे पळून गेल्याचे समजते . घटनेतील जखमींना पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमीच्या पोटाला गंभीर दुखापत असल्याने नातेवाईक यांनी पुढील उपचारासाठी धुळे घेऊन गेल्याचे कळत.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *