अमळनेर: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मध्ये इयत्ता १० वि च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी अध्यक्षस्थानी होते.तर साई प्रतिष्ठान चे शरद पाटील प्रमुख पाहुणे होते.
मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वि च्या परीक्षेसाठी शाळेतुन ३५८ मुले प्रविष्ठ झाली आहेत.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवरील माहितीचे सखोल मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक ए.डी.भदाणे,एस.आर.शिंगाने, जेष्ठ शिक्षक सी.एस.सोनजे,के.पी.पाटील,के.आर.बाविस्कर उपस्थित होते.
परीक्षेच्या बाबतीत प्रशासनाने घेतलेली कठोर भूमिका,कॉपीमुक्त अभियानाचे महत्व,परीक्षेच्या काळातील वेळेचे व्यवस्थापन,आहार व स्वास्थ्य यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विदयार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विषय शिक्षकांनी समजावून सांगितले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन आर.जे.पाटील यांनी केले तर आभार आर.एन.साळुंखे यांनी मानले.