अमळनेर: येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ३ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता विश्वसम्राट बळीराजा स्मारकापासून निघणाऱ्या सांस्कृतिक विचार यात्रेने होणार आहे. जिजाऊ सावित्रीच्या वेशात सहभागी होणाऱ्या शेकडो लेकी व महिला या यात्रेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
विद्रोहीच्या सांस्कृतिक विचार यात्रेमध्ये आदिवासी संस्कृतीतील विविध वाद्य शिवली पावरी सह आदिवासी ढोल नृत्य, महिलां व युवतींचे ढोल पथक, लक्षवेधी ठरणार आहे विविध सांस्कृतिक देखावे बहुजन महापुरुषांचे वेश घातलेले कार्यकर्ते विद्रोही साहित्य संमेलनाची पेनाची निप लावलेली तोफ,यासह विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमध्ये या सांस्कृतिक विचार यात्रेत सहभागी होतील. सदर सांस्कृतिक विचार आणि यात्रा बळीराजा स्मारकापासून अण्णाभाऊ साठे स्मारक कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे रोड मार्गे आर के नगर समोरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी पर्यंत निघेल. विचार यात्रेच्या संमेलन स्थळी होणाऱ्या होणाऱ्या समारोपा नंतर संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नागरिकांनी व महिलांनी सदरच्या आगळी वेगळ्या सांस्कृतिक विचार यात्रेत सहभागी होऊन विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.