अमळनेर: तालुख्यातील मारवड येथिल ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित वाट माहेरची हा मारवड आणि मारवड च्या भूमित शिकलेल्या सर्व माहेरवाशीन लेकिंचा ‘माझं माहेर मारवड ‘ हा स्नेहमेळावा ज्ञानदेव .मुक्ताई ग्रुप मारवड यांच्यातर्फे दि.४ नोव्हेंबर वार . सोमवार रोजी सु हि. मुंदडे हायस्कुलच्या प्रांगणात अतिशय भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. २० वर्ष पासुन ते ९२ वर्ष वयाच्या भगिनीची उपस्थित होती. शेकडोंच्या संख्येतील माहेरवाशिनींच्या अभुतपूर्व प्रतिसादाने हा सोहळा अतिशय रंगतदार ठरला, गावदरवाजा वरील गणेश पुजनाने रॅलीची सुरवात झाली रॅलित माँसाहेब जिजाऊ, झाशीची राणी, . सावित्रीमाई, यांसारख्या कर्तबगार महिलांची वेशभूषा साकारली होती.कन्या शाळेच्या मुलिंच्या लेझीम पथकाने नृत्य केले. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. मासाहेब जिजाऊ व सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. दिवंगत झालेल्या सर्व माहेरवाशिन भगिनिंना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. अनिता बोरसे, सौ.रूपाली पाटिल मॅडम यांच्या माहेरच्या कथा मनात घर करून गेल्या. तसेच सौ.अश्विनी चौधरी, सौ.वृषाली पाटील यांचे कथ्थक नृत्य,व सौ.योगिता पांडे व वृक्षवल्ली गृप यांच्या रासनृत्याने रंगत आणली. करोडपती फेम श्री.शरद भाऊ धनगर यांच्या अहिराणी भाषेतील मायमाहेरच्या ओव्या, आणि कवितेने उपस्थित महिला भगिनी भावविभोर झाल्या. तर सौ.अपेक्षा पवार व सौ.शुभांगी खंडाळे यांच्या गीतांवर मनमुराद नृत्याचा आनंद सर्व भगिनिंनी लुटला.मारवडच्या माय -माहेरातील भुतकाळाच्या स्मृती, बालपणाच्या, शालेय जीवनाच्या आणि गावच्या आठवणिंना कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला.सर्व वयोगटाच्या अनेक सखींना अनेक वर्षानंतर माहेरात भेटण्याचा दुर्मिळ योग यानिमित्ताने आला. उपस्थित सर्वांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.कार्यक्रमाच मुख्य आकर्षण असलेल्या लकी ड्रॉ च्या भाग्यवान विजेत्या भगिनिंना ” ज्ञानदेव मुक्ताई ग्रुप कडून,” माहेरची साडी ” स्नेहभेट म्हणून ‘देण्यात आली. यावेळी माहेरवाशिण भगिनिंनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यात सहभागी सर्व स्पर्धकांना पारस गोल्ड,व पद्मालय पोहे, अमळनेर यांचेकडून स्नेहभेट, व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.क कार्यक्रमात आकर्षक असलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी साठी भगिनिंची लगबग दिसुन आली. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन सौ. रेखा मराठे व सौ. वर्षा पवार, प्रास्ताविक सौ.नलिनी मुंदडा यांनी तर आभार प्रदर्शन सौ.करुणा गरुड व सौ.रजनी गुरव यांनी केले.कार्यकमाच्या यशस्वितेसाठी ‘ज्ञानदेव- मुक्ताई ‘ ग्रुपचे श्री. गोकुळ पाटील, श्री सुभाष पाटील, महेश साळुंखे, प्रदिप चौधरी, विनय साळुंखे, दिपक पाटील, सचिन साळुंखे,देवेंद्र साळुंखे, राकेश गुरव,प्रदिप निकम, उमेश सुर्वे,शरद पाटील,सुजित साळुंखे, यांनी सहकार्य केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.