अमळनेर: दि.18.10.2023 पासून राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गाव पातळीवर *सुमारे 67 हजार आशा स्वयंसेविका आणि सुमारे 5 हजार गटप्रवर्तक* गेली 14 ते 15 वर्षे आरोग्य सेवा देत असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकविध लढे आणि आंदोलने करीत आहेत. तरीही शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सततपणे दुर्लक्ष केले आहे म्हणून त्यांच्यात प्रचंड चिड आणि असंतोष निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने आशा आणि गतप्रवर्तकांनी आपल्या खालील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी *दि.18 ऑक्टोबर 2023 पासून सर्व प्रकारची दैनंदिन कामे बंद करून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.* *मागण्या*
१) आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देऊन सेवेचे फायदे लागु करावे.
२) आशा स्वयंसेविकांना १८ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार किमान वेतन लागू करण्यात यावे.
३) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना भाऊबीज भेट देण्यात यावी.
४) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सेवा निवृत्तीचे वय निश्चित करुन पेन्शन लागू करावे.
५) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना EKYC , आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढण्याची तसेच ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये.
६) आशांना दिला जाणारा मोबदल्यात आणि गटप्रवर्तकांच्या प्रवास भत्त्यात तिपटीने वाढ करावी.
७) ऑनलाईन कामे करण्यासाठी आशा स्वयंसेविका मोबाइल आणि गतप्रवर्तकांना लॅपटॉप पुरविण्यात यावेत.
८) आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तकांना दिल्या जाणाऱ्या सादील खर्च आणि मोबाइल रिचार्जच्या रकमेत भरीव वाढ करण्यात यावी.
यासह अन्य प्रलंबीत मागण्या सोडविण्यासाठी आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक दि.१८ ऑक्टोबर पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. सदर संपाची जाहिर नोटिस देण्यासाठी जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हा परिषदेवर विशाल मोर्चा काढण्यात आला.
रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा समूह संघटक प्रविण जगताप, भागिरथी पाटील, कल्पना भोई, सुनंदा पाटील,लता सुधीर,प्रिती चौधरी यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर शिफारस केली जाईल तसेच जिल्हा पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी उद्या दि.१८ रोजी दुपारी ३ वाजता संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे श्री.अंकित यांनी सांगितले.
मोर्चाला दुपारी १.०० वाजता डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यानातून सुरूवात झाली मोर्चात जिल्हयातील बहुसंख्य आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक सहभागी झाल्या.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनंदा हडपे,संगिता पाटील,भारती नेमाडे,आशा पोहेकर,उषा पाटिल,उज्वला काळे,भारती तायडे,माया बोरसे, रविशा मोरे,नम्रता पाटील,हर्षा पाटील,भारती चौधरी,उषा मोरे,लता सुशिर,शितल सोनवणे, कल्पना मोरे,यांनी केले.