उपक्रमशील शिक्षक ईश्वर महाजन यांना शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार घोषित

24 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार सन्मान

अमळनेर: देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल शाळेतील शिक्षक ईश्वर रामदास महाजन जळगांव जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे.निवडपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस सागर हिवराळे यांनी एका पत्रकाद्वारे निवड करून निवड पत्र पाठवले आहे.
देवगांव देवळी येथील उपक्रमशील शिक्षक ईश्वर रामदास महाजन गेल्या 21 वर्षापासून शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वकृत्व स्किल डेव्हलप होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करणे यासाठी संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळते.
जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार २४ सप्टेंबर ला मंगलमय हॉल कलिंगा माता मंदिराजवळ टाटा मोटर शेजारी नॅशनल हायवे वर जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांचे अभिनंदन जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड, माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, , मंगळग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अमळनेर तालुका अध्यक्ष जयंतलाल वानखेडे व संघटनेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार पाटील,जळगाव जिल्हा क्रिडा संघटनेचे राजेश जाधव सर,
,गणित मंडळाचे समन्वयक डि ए.धनगर, विज्ञान मंडळाचे समन्वयक डी के पाटील,निरंजन पेंढारे, साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे ,चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ, अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे व कार्यकारणी सदस्य, शिवशाही फाउंडेशन चे जयेश काटे व उमेश काटे, साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे,
शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे, ब्राह्मणे ता.अमळनेर येथील पोलीस पाटील व विकास सोसायटीचे चेअरमन गणेश भामरे, व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

[democracy id="1"]