तरुणींना छेडणाऱ्या एकाला दिला प्रसाद तर एकाचे अडीच लाखाचे हरवलेले ब्रेसलेट परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

अमळनेर :जनतेच्या तत्पर सेवेसाठी सुरू केलेल्या डायल ११२ चा उपयोग केल्याने तरुणींना छेडणाऱ्या एकाला ‛प्रसाद ’ देण्यात आला तर एकाचे अडीच लाखाचे हरवलेले ब्रेसलेट परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
तालुक्यातील एका खेड्यावरून येणाऱ्या मुलींचा पाठलाग करून दुसऱ्या खेड्यावरील एम एस डब्ल्यू झालेल्या तरुणाने छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याने त्या तरुणींना डायल ११२ ची आठवण झाली. त्यांनी ११२ डायल करताच पो नि शिंदे यांच्या आदेशाने निलेश मोरे व गणेश पाटील यांनी बसस्थानकावर धाव घेत त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण मनोरुग्ण असल्याने पोलिसांच्या अंगावर धावून गेला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेऊन गणपतीचा ’प्रसाद’ दिला. नंतर त्याच्या पालकांना बोलावून समज देण्यात येऊन त्याला सोडून देण्यात आले.
तर दुसऱ्या घटनेत सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांच्या हातातील सुमारे अडीच लाखाचे २५ ग्राम सोन्याचे ब्रासलेट रस्त्यात पडले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी ११२ च्या पथकाला तात्काळ पाठवले. शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका महाविद्यालयीन तरुणाने ते बेंटेक्स समजून घरी नेले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्या घरून ब्रासलेट ताब्यात घेऊन सुरेश पाटील यांना परत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,निलेश मोरे , महेश पाटील ,प्रवीण पाटील हजर होते.

[democracy id="1"]