श्रद्धेने आणि एकोप्याने सण साजरे करा .श्री.एम.आर. राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव

अमळनेर: आज अमळनेर येथे मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक वाणी मंगल कार्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सूत्रसंचालन डॉ. शरद पाटील पोलीस गोपनीय विभाग अमळनेर यांनी केले प्रास्ताविक श्री विजय शिंदे साहेब पोलीस निरीक्षक अमळनेर यांनी केले प्रास्ताविकात साहेबांनी अमळनेर शहरात 142 मंडळ आहेत असे सांगितले त्यापैकी टप्प्याटप्प्याने गणेश विसर्जन करण्यात येणार आहे पाच दिवस सात दिवस आठ दिवस नऊ दिवस आणि शेवटी अकराव्या दिवशी 19 गणेश मंडळ गणेश विसर्जन करतील आणि त्यांच्या झामी चौक ते फरशी रोड, बंगाली फाईल ते फरशी रोड असा असेल असे सांगितले त्यानंतर गणेश विसर्जन तापी नदी सावखेडा, मंगळ ग्रह तलाव ,बोरी नदी या ठिकाणी विसर्जन केले जाईल असेही नमूद केले प्रांताधिकारी महादेव खेडकर साहेब ,स्मिताताई वाघ ,नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अँड. व्हि.आर. पाटील, अँड.शकील काझी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिलोत्तमाताई पाटील, इमरान खाटीक यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रेक्षकांमधून प्रा. अशोक पवार सर विजू मास्तर, पत्रकार धनंजय सोनार ,संजय पाटील यांचे सूचना वजा म्हणणे ऐकून घेण्यात आले अध्यक्षीय भाषणात श्री .एम आर. राजकुमार साहेब पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सांगितले की सण उत्सव हे फक्त मौज मस्ती साठी साजरे करू नका तर श्रद्धेने आणि एकोप्याने राहून साजरे करा यामध्ये आपल्या परिवाराचा सक्रिय सहभाग घ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉक्टर ,प्राध्यापक इंजिनिअर ,शिक्षक वकील ,व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांना सामील करून घ्या जेणेकरून परिवारातून सामाजिक जाणिवेची आणि संस्कृतीची संकल्पना पुढे येईल आणि सर्व सण-उत्सव हे शांततेने साजरे होतील असे विचार मांडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमळनेर विभागाचे डीवायएसपी श्री सुनील नांदवळकर साहेब यांनी केले कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील नवनियुक्त पोलीस पाटील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयवंत वानखेडे आणि सर्व सदस्य ,व्हॉइस ऑफ मीडिया ते सर्व सदस्य अमळनेर व शहर पत्रकार संघाचे सर्व सदस्य पोलीस विभागातील श्री.अनिल भुसारे साहेब, श्री.सिद्धार्थ शिसोदे गोपनीय विभाग आणि सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

[democracy id="1"]