श्रावणमासात मंगळग्रह मंदिरातील रुद्राभिषेकाने नवचैतन्याची अनुभूती !

अ‍ॅड. स्नेहलता पाटील, अ‍ॅड. योगेश मेटकर, कुमारपाल कोठारी (बाळू कोठारी), प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्याहस्ते महापूजा

अमळनेर : श्रावणमास म्हणजे पवित्र मास . या महिन्यात सर्वच देव-देवतांसह ग्रह-ताऱ्यांचे पूजन भाविक व्यापकतेने करतात. त्यातही देवांचे देव महादेव यांच्या पूजनाचे या महिन्यात विशेष महत्त्व असते.
या पार्श्वभूमीवर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दर श्रावणी सोमवारी रुद्र पूजा तर अखेरच्या श्रावण सोमवारी लघुरुद्र पूजा करण्यात आले. या पूजांचा मान चार भाविकांना देण्यात आला.
या पूजा समयी पुरोहितांनी म्हटलेले मंत्रोपचार, पूजा-विधी यामुळे आम्हाला नवचैतन्याची अनुभूती मिळाली, असे भावोद्गार पूजेचे यजमान सरकारी वकील अ‍ॅड. स्नेहलता पाटील, अ‍ॅड. योगेश मेटकर, व्यावसायिक कुमारपाल कोठारी (बाळू कोठारी) व प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी काढले.
पहिल्या सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सरकारी वकील अ‍ॅड. स्नेहलता पाटील, दुसऱ्या सोमवारी, २८ ऑगस्ट रोजी सरकरी वकील अ‍ॅड. योगेश मेटकर, तिसऱ्या सोमवारी ४ सप्टेंबर रोजी कुमारपाल कोठारी (बाळू कोठारी) आणि शेवटच्या सोमवारी, ११ सप्टेंबर रोजी अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर हे सपत्नीक पूजेचे यजमान होते. मुख्य पुरोहित जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, सौरभ वैष्णव, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. त्यांना सारंग पाठक व निलेश आसोदेकर यांचे सहकार्य लाभले. मंगळग्रह सेवा संथेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे, अनिल अहिरराव यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर मंगळवारी सत्यनारायण महापूजा

श्रावणमासानिमित्ताने दर मंगळवारी श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी ८ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. विविध मंत्रोपचार व त्यास लयबद्ध म्हटल्या गेलेल्या गणपती, भगवान शंकर व सत्यनारायण महाराज यांच्या महाआरतींमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यादिवशी दिवसभर भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रावणातील गुरुवारी गायत्री महायज्ञाचेही आयोजन करण्यात आले.

-महादेव खेडकर, प्रांताधिकारी, अमळनेर

श्रावणपर्वात श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक महापूजेचा आम्हा दाम्पत्याला मान मिळाला, हे आमचे भाग्यच. या पूजेने आत्मिक शांती लाभली. सर्वत्र भक्तिमय सुगंध दरवळल्याने नवचैतन्याची अनुभूती आली. यासाठी आम्ही मंगळग्रह सेवा संस्थेचे ऋणी आहोत.

[democracy id="1"]