अमळनेरहून धरणगाव जाण्यासाठी ढेकू सारबेटे मार्गाचा वापर करण्याचेआवाहन

अमळनेरहून धरणगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे अंतर्गत बोगद्याचे काम सुरू असल्याकारणाने सदर रस्ता दूचाकी वगळता सर्व जड वाहनांसाठी पुढील चार महिन्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. वाहनधारकांनी अमळनेरहून धरणगाव कडे जाण्यासाठी ढेकू- सारबेटे मार्गाचा वापर करावा. असे आवाहन अमळनेर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

अमळनेरहून धरणगाव जातांना चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे फाटक क्रमांक १३७ येथे एका बाजूच्या बोगद्याचे काम झाले आहे. एका बाजूचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर पासून हा मार्ग पुढील चार महिन्यांसाठी जड वाहनांसाठी बंद असणार आहे. दूचाकी वगळता एसटी, ट्रक, ट्रॅक्टर, मालट्रक यांसारख्या जड वाहनांनी धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.