सरकारी अभियोक्ता ऍड विजय ढीवरे संविधान रत्न या पुरस्काराने सन्मानित

अमळनेर : येथील सरकारी अभियोक्ता विजय धिवरे यांना आंबेडकर स्मारक समिती यांच्या कडून संविधान रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

मावळ,पुणे येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यावर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे
वकीलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाईचे १२५ वे जन्मवर्ष साजरी करीत आहेत. या
निमित्ताने अमळनेर येथील सरकारी अभियोक्ता ऍड विजय धिवरे यांचे न्यायदान प्रक्रियेतील योगदान व त्यातून घडलेली देशहिताचे कार्य पाहता त्यांना “संविधान रत्न ” या पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठरवले आहे. हा सन्मान दि. ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत भेगडे लॉन्स, वडगाव मावळ,पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. तरी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ऍड विजय धीवरे यांनी जातीने उपस्थित राहण्याची विनंत,संघटनेचे अध्यक्ष ऍड रंजनाताई भोसले,सचिव किसन थूल यांनी पत्र देऊन कळविले आहे.ऍड विजय धिवरे यांचे मंगरूळ एमआयडीसी चे अध्यक्ष जगदीश चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश जाधव, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी नरसिंह वाघ, ज्येष्ठ वकील श्रावण ब्रम्हे,प्रा विजय खैरनार,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे जलगावं जिल्हा कार्याध्यक्ष विजय गाढे, अर्बन बँकेचे संचालक भरत ललवाणी तसेच अमळनेर वकील संघ यांच्या सह सर्व स्तरातून कौतुक सह अभिनंदन करण्यात येते आहे.

न्यायप्रिय व्यक्ती म्हणून जन माणसात त्यांची प्रतिमा

विजय शामराव ढिवरे यांनी 1990 जानेवारी वकिली सुरू केली.2000 पासून 2007 पर्यंत विशेष सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून काम केले.तसेच 2007 ते 2010 या कालावधीत पोलीस विभागात विधी अधिकारी म्हणून काम पाहिले.2011 ते 2017 पुन्हा सरकारी अधिवक्ता तर 2017 ते 2000 विधी अधिकारी व पुन्हा सरकारी वकील आज पर्यंत कार्यरत आहे.
आता पुन्हा विधी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.एक कायदे पंडित तथा न्यायप्रिय व्यक्ती म्हणून जन माणसात त्यांची प्रतिमा आहे.

[democracy id="1"]