अनेक गावांना मिळणार मूलभूत सुविधा,ग्रामविकास व पंचायतराज विभागाचा मंजुरी
अमळनेर: येथील आमदार अनिल भाईदास पाटील हे मंत्रीपदी विराजमान झाल्यापासून विकास कामांसाठी निधीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून दीड महिन्याच्या खंडानंतर तालुक्यात वरुण राजाची भरभरून बरसात झाली असताना मंत्री ना.पाटील यांनी ग्रामिण भागात दहा कोटी निधीची बरसात केल्याने ग्रामिण जनता सुखावली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचा शासन आदेश दि 5 सप्टेंबर रोजी निघाला असून यानुसार अमळनेर मतदारसंघात लेखाशिर्ष 2515 व 1238 या योजनेंतर्गत ग्रामिण भागात दहा कोटी निधीतून मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.विशेष म्हणजे बहुसंख्य गावांचा समावेश यात मंत्री अनिल पाटील यांनी करून समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.सदर निधीच्या मंजुरीबद्दल नामदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे मतदारसंघातील जनतेच्यास वतीने आभार व्यक्त केले आहेत.
या गावात होणार विकासकामे,,, प्र.डांगरी येथे आदिवासी वस्तीत गटार बांधकाम रक्कम २० लाख, मारवड गाव अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण रक्कम १५ लाख, गोवर्धन भिल्ल समाजासाठी सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, अंतुर्ली कार्तीक स्वामी मंदिराजवळ सभामंडप बांधकाम रक्कम २० लाख, अंबारे गांव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, कलाली चौक सुशोभिकरण रक्कम १० लाख, हिंगोणे खु. प्र.ज. गावा अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण रक्कम २० लाख, कळमसरे सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम २० लाख, गंगापुरी ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम रक्कम २० लाख, मठगव्हाण सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम २० लाख, रुंधांटी सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, सावखेडा रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम १५ लाख, मेहरगांव सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, तासखेडा सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, नंदगांव महादेव मंदिराला सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, दापोरी सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, दहिवद गाव दरवाजा बांधकाम रक्कम २० लाख, औरंगपुर आर.ओ. प्लॉन्ट बसविणे रक्कम १० लाख, नगांव बु चौक सुशोभिकरण रक्कम १० लाख, नगांव खु रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम १० लाख, सोनखेडी ग्रामपंचायत जवळ कॉक्रीटीकरण रक्कम १० लाख, निमझरी चौक सुशोभिकरण रक्कम १० लाख, रामेश्वर बु गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, खेडी व्यवाहरदळे रस्ता
कॉक्रीटीकरण रक्कम १५ लाख, म्हसले सामाजिक सभागृह बांधकाम रक्कम १५ लाख, कंडारी खु एकलव्य स्मारक बांधकाम रक्कम ५ लाख, लोणे एकलव्य स्मारक बांधकाम रक्कम ५ लाख, खोैशी चौक सुशोभिकरण रक्कम १० लाख, पातोंडा गाव दरवाजा बांधकाम रक्कम २० लाख, पिंपळी एकलव्य स्मारक बांधकाम रक्कम ५ लाख, खेडी खु. प्र. ज. स्मशानभुमी बांधकाम रक्कम १५ लाख, पिळोदा भिल वस्तीत सभामंडप बांधकाम रक्कम १० लाख, गडखांब सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, मंगरुळ सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, अंचलवाडी स्मशानभुमी सुशोभिकरण रक्कम १५ लाख, पळासदळे आर.ओ. प्लॉट बसविणे रक्कम १० लाख, सुंदरपट्टी सामाजिक सभागृह बांधकाम रक्कम १५ लाख, ढेकु तांडा सामाजिक सभागृह बांधकाम रक्कम १५ लाख, इंदापिंप्री सामाजिक सभागृह बांधकाम रक्कम १५ लाख, कन्हेरे रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम १० लाख, फाफोरे खु स्मशानभुमी बांधकाम रक्कम १५ लाख, वासरे सामाजिक सभागृह बांधकाम रक्कम १५ लाख, भिलाली सात्वन शेड बांधकाम रक्कम १० लाख, ढेकु बु सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, मौजे बाम्हणे स्मशानभुमी बांधकम रक्कम १५ लाख, मौजे कळंबु गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, खर्दे गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, खेडी सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, लोणपंचम सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, भरवस रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम १० लाख, लोण खु. सात्वण शेड बांधकाम करणे रक्कम १० लाख, लोणचारम तांडा गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, हेडावे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम रक्कम २० लाख, गलवाडे बु गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, आर्डी गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, तरवाडे संरक्षण भिंत बांधकाम रक्कम १५ लाख, गांधली सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, वडगांव रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम १० लाख, पिंपळकोठा गाव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, वसंतनगर रस्ता काँक्रीटीकरण रक्कम २० लाख, हिवरखेडा खु पेव्हर ब्लॉक बसविणे रक्कम ५ लाख, दळवेल गाव दरवाजा बांधकाम रक्कम २० लाख, बहादरपुर सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, भिलाली काँक्रीटीकरण रक्कम १५ लाख, शेवगे बु गांव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, खेडीढोक रस्ता कॉक्रिटीकरण रक्कम १० लाख, दगडी सबगव्हाण विठ्ठल मंदिराला सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १५ लाख, शेळावे बु गांव दरवाजा बांधकाम रक्कम १५ लाख, दहिगाव स्मशानभुमी बांधकाम रक्कम १० लाख, भोकरबारी रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम १० लाख, नेरपाट सात्वन शेड बांधकाम रक्कम १० लाख, राजवड सामाजिक सभामंडप बांधकाम रक्कम १० लाख