पिक विमा कंपनीचे प्रतिनिधीनी अमळनेर तालुक्यात दुष्काळ परिस्थिती केली पाहिणी

जळगाव जिल्ह्यातून पिक विमा या कंपनीचे प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात वीस लोकांची टीम दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी आलेत.

अमळनेर: तालुक्यात गेल्या महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिके कोमजून लागली आहेत. चिमनपुरी पिंपळे, आर्डी,जवखेडा, मंगरूळ,शिरसाळे या भागात कृषी विभाग पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तलाठी ग्रामसेवक यांच्यासह शेतकऱ्यांचे उपस्थितीत सुकलेल्या पिकांची काही शेतकऱ्यांच्या शेतात नजर पाहणी करण्यात आली यावेळी
.ज्वारी, बाजरी, उडीद, मुंग कपाशी, तूर, आधी पिकांच्या उत्पन्नात 80 ते 90 टक्के घट झाल्याची दिसून आले पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात वावडे महसूल मंडळामध्ये या समितीद्वारे 10ते 15 टक्के शेतातली पिकांची नजर पाहणी पूर्ण करण्यात आली यामध्ये प्रत्येक पिकाचे 10 ते 12 शेतकऱ्यांचे पंचनामे महसूल, कृषी विभाग, विमा कंपनीचे अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी कृषी अधिकारी पूनम सुभाष पाटील, तलाठी भूपेंद्र पाटील, विमा प्रतिनिधी तुषार चौधरी ग्रामसेवक किरण लंकेश यांच्या उपस्थिती त शेतात पिकांची नजर पाहणी करण्यात आली याप्रसंगी चिमणपुरी पिंपळेचे शेतकरी माझी सरपंच योगेश अशोक पाटील, युवराज डी पाटील,विनोद नाना पाटील,गोविंदा काशिनाथ चौधरी,जयवंतराव डी पाटील,निबा शांताराम पाटील,सुभाष एकनाथ चौधरी,
सुखदेव बाबुराव पाटील, महेंद्र गटा पाटील ,ज्ञानेश्वर रावण पाटील ,मोतीलाल सिताराम पाटील, विनोद नारायण पाटील ,निंबादयाराम चौधरी, छोटू पुना चौधरी,संजय चुडामन चौधरी, दिनेश प्रेमराज पाटील, सुभाष दौलत पाटील , गुलाब नाना पाटील,भैय्या सुखदेव पाटील, अरुण रतन नेरकर,अनिल युवराज पाटील,श्याम लुका पाटील यांच्या सह शेतकरी उपस्थित होते

[democracy id="1"]