मारवड महाविद्यालयातील प्राध्यापक व ग्रंथपाल यांना “राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न” पुरस्कार प्राप्त

मारवड, ता. अमळनेर: येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी व ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांना नुकताच धुळे येथील रायबा बहुउद्देशीय संस्थेमार्फत “राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी धुळ्याचे मा. आमदार प्रा. शरद पाटील व श्री. गोरख देवरे, (राष्ट्रीय अध्यक्ष – नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), श्री. रविकिरण पाटकरी. संचालक प्रकाश अकॅडमी, धुळे. श्री. गेंदिलाल साळुंखे, माजी शिक्षणाधिकारी धुळे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. राकेश पाटील, सचिव प्रा. प्रमोद पाटील, सौ प्रिया पाटील (नाॅर्थ महाराष्ट्र डायरेक्टर- नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), प्रा. डाॅ. उमेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

डॉ. माळी व प्रा. पाटील यांनी ” राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न” पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे संस्थाध्यक्ष मा. आबासाहेब जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष मा. आबासो. देविदास साळुंखे, सचिव मा. आबाजी देविदास बारकू पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व सर्व प्राध्यापक – प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

[democracy id="1"]