अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

अमळनेर:-दि ६ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ने ग्राहक पंचायतीच्या स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम ग्राहक तीर्थ स्वर्ग.बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यारर्पण करण्यात आले. जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख विजय शुक्ला यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले की गेल्या पंधरा वर्षापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर कार्यरत असून ग्राहकांच्या विविध अडचणी उदाहरणार्थ बँकिंग , विज बिले बाबतच्या , तहसील कार्यातील , रेशन कार्ड संबंधित , एसटी महामंडळ, रेल्वे , भूमी अभिलेख इत्यादी कार्यालया संबंधित अनेक आहेत तक्रारी आम्ही समन्वयाने सोडविलेल्या आहेत व भविष्यातही येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आम्ही कसोशीने प्रयत्न करू असे सांगितले. जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी यांनी सांगितले की येत्या ऑक्टोंबर महिन्यात दिनांक ७ व ८ रोजी ओझर नाशिक येथे येथे महोत्सवी अमृत महोत्सवी वर्षाच्या साजरा करण्याचे अखिल भारतीय मध्य महाराष्ट्र प्रांत संघटनेने ठरविलेले आहे त्या अनुषंगाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त उदारहस्ते सहयोग निधीला देणगी देऊन सहकार्य केले आहे त्यांचेही ऋणनिर्देश यावेळी करण्यात आले व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले तसेच आतापर्यंत ऑनलाईन ६० नागरिकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सभासदत्व स्वीकारले आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्या अध्यक्ष संभाषणात एडवोकेट भारती अग्रवाल यांनी सांगितले की सन १९७४ मध्ये पुणे येथे स्वर्ग.बिंदू माधवजोशी यांनी ग्राहक चळवळ ची सुरूवात केली व त्याला यश येऊन ६ सप्टेंबर१९७५ मध्ये ग्राहक पंचायतिची मुहूर्त मेढ न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागला यांचे उपस्थितीत पार पडली. स्वर्ग. बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नाने सन १९८६ वर्षी ग्राहक संरक्षण कायदा त्यांनी संसदेत पंतप्रधान स्वर्ग. राजीव गांधी असताना मंजूर करून घेतला होता. आज आपण ५० वे वर्षे अमृत महोत्सव साजरे करीत असल्याचे आनंद व अभिमान सर्व सभासदांना आहे. ग्राहकांचे हक्क व त्यांची कर्तव्य त्यांना वेळोवेळी ग्राहकपंचायतीमार्फत निर्देशिले दिले जात असते असेही त्यांनी आपल्या संभाषणात प्रतिपादिले.

याप्रसंगी अ.भा.ग्राहक पंचायत अमळनेरचे सक्रिय कार्यकर्ते जयंतीलालजी वानखेडे यांच्या महाराष्ट्र मराठी पत्रकार तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व श्रीमती विमल मैराळे यांनी सभासद वाढीसाठी विशेष प्रयत्न केले त्याबद्दलही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री आर एस पाटील यांनी नूतन सभासद म्हणून प्रवेश घेतला यावेळी त्यांच्याही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास ऊर्जा मित्र सुनील वाघ , गोकुळ बागुल,शिवाजीराव पाटील, हस्ती बँकेचे व्यवस्थापक अनिल शिंपी,राजेश अग्रवाल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती मेहराज बोहरी कळवितात.

[democracy id="1"]