पूज्य साने गुरुजी प्रश्न मंजुषा राज्यस्तरीय स्पर्धेत(2023) एल.बी.एस धर्माबादचा संघ अव्वल

स्पर्धा परीक्षा अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग : –
मा.सुनिल नांदवाळकर

(डी.वाय.एस.पी,अमळनेर पोलीस स्टेशन)

अमळनेर : करिअर कौंसेलिंग सेंटर,प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर व लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा 5 व 6 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या. हे या स्पर्धेचे 8 वे वर्षं असून 2014 पासून प्रस्तुत राज्यस्तरीय स्पर्धेची सुरुवात डॉ. एस.ओ.माळी सर यांनी केली होती.
उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले.इतिहास विभाग प्रमुख डॉ.धनंजय चौधरी व त्यांच्या टीमने खरा तो एकची धर्म या गीता सह स्वागत गीत म्हटले.सरस्वती देवी,श्रीमंत प्रताप शेटजी,पूज्य साने गुरुजी,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजन नंतर उदघाटकांचा परिचय प्रा.वृषाली वाकडे,प्रा देवेंद्र तायडे यांनी करून दिला.
या स्पर्धेचे उदघाटन माजी प्रतापियन्स मुख्याधिकारी अर्चना निंबा राजपूत,पी.एस.आय.महेश जाधव यांनी केले.या वेळी समारंभाचे अध्यक्ष खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे हे होते.मंचावर प्राचार्य डॉ.अरुण जैन,सह सचिव डॉ. धिरज वैष्णव,लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलिप गांधी,सचिव दिनेश मणियार,सदस्य राजुभाई डांगा,प्रश्न मंजुषा स्पर्धेचे समन्वयक डॉ.कल्पना पाटील आदी उपस्थित होते.या वेळी वाणिज्य व व्यवस्थापन या विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केल्यामुळे प्रा.बालाजी कांबळे यांचा सत्कार डॉ.अनिल शिंदे यांनी केले तर नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे सी सी एम सी विभागाचा विद्यार्थी उमेश पाटील(इतिहास) यांचा सुद्धा या वेळी सत्कार डॉ अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी डॉ अनिल शिंदे,कु.अर्चना राजपूत,महेश जाधव,नितिन विंचूरकर यांनी आम्ही कसे घडलो या बाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ.नलिनी पाटील यांनी केले तर आभार स्पर्धेच्या संयोजिका डॉ.कल्पना पाटील यांनी मानले.प्रस्तुत कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव,प्रा.किरण गावित यांनी प्रश्न विचारले.
दुस-या दिवशी 6 सप्टेंबर रोजी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी पोलीस उप विभागीय अधिकारी मा.सुनिल दिगंबर नांदवाळकर साहेब, प्रसिद्ध कवी शरद धनगर हे होते.तर विचार मंचावर समारोप समारंभाचे अध्यक्ष मा.प्रदिप भाऊ अग्रवाल,प्राचार्य डॉ.अरुण जैन, खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक योगेश मुंदडे, सी.ए.नीरज भाऊ अग्रवाल,लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलिप गांधी,सचिव दिनेश मणियार,कोषाध्यक्ष पंकज मुंदडे, डॉ.रविंद्र जैन,प्रकाश शहा,प्रशांत सिंघवी आदी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचा परिचय डॉ धनंजय चौधरी,प्रा प्रशांत ठाकूर यांनी करून दिले.
या प्रसंगी स्पर्धेत आलेल्या संघांपैकी प्रा. लोकेश तायडे(जळगाव),धम्मरत्न अवधुते(नांदेड) यांच्या सह डॉ रविंद्र जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रस्तुत समारोप प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल नांदवाळकर साहेब,कवी शरद धनगर यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच या विश्वात अशक्य काहीच नाही फक्त परिश्रम करा,अभ्यासात दिखावा नको तर प्रामाणिक अभ्यास करा आणि नम्र व्हा,पायाभूत संकल्पना समजून घ्या या साठी ग्रंथालयात नेहमी जा आणि वाचक बना,अपयश हे कायम नसते तर ते यशा कडे जाण्याचा एक सुकर मार्ग असतो असा सल्ला व मार्गदर्शन प्रमुख अतिथीनी केले.समारोप प्रसंगी डॉ.अनिल शिंदे यांनी स्पर्धेत अभ्यास,चिकाटी,परिश्रम फार महत्वाचे असते अशी भूमिका मांडली तर अध्यक्षीय मनोगतात प्रदिप अग्रवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी जेष्ट उप प्राचार्य डॉ.जे.बी.पटवर्धन,डॉ.व्ही.बी मांटे यांच्या सह प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या आयोजनातील सर्व सन्मानीय प्राध्यापक-प्राध्यापिका,सी सी एम विभागाचे विद्यार्थी व कर्मचारी,विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी बहू संख्येने उपस्थित होते.
प्रस्तुत समारंभाचे सूत्र संचालन प्रा ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तर आभार डॉ कल्पना पाटील यांनी मानले.प्रस्तुत स्पर्धेच्या यशा साठी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष,कार्योपाध्यक्ष,सर्व संचालक मंडळ,चिटणीस,प्राचार्य,संस्थेचे सह सचिव,सर्व उप प्राचार्य,सर्व विभाग प्रमुख,कार्यालयीन अधिक्षक, लेखापाल यांनी सहकार्य केले.या स्पर्धचे समारोप संशोधक हर्ष अरुण नेतकर यांनी वाद्य वाजवून राष्ट्र गीताने करण्यात आले.


राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचा निकाल:
1.प्रथम(गौरव चिन्ह,रु 10000) –
लाल बहादूर शास्त्री
महाविद्यालय,धर्माबाद,जिल्हा नांदेड,
2.व्दितीय (गौरव चिन्ह,रु 7000)
एम.जे.कॉलेज(स्वायत्त),जळगाव
दुस-या क्रमांकाचे बक्षिस हे लायन्स
क्लब,अमलनेरच्या वतिने देण्यात आले.
3.तृतीय(गौरव चिन्ह,रु 5000)-
पंडित जवाहरलाल नेहरू
समाज कार्य महाविद्यालय,अमळनेर,
4.उत्तेजनार्थ पहिले(गौरव चिन्ह,
रु 1000)महाराजा सयाजीराव
गायकवाड कॉलेज,माळेगाव.
5.उत्तेजनार्थ दुसरे(गौरव चिन्ह,
रु 1000)-
प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर


[democracy id="1"]