पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षक दिना निमित्त केले वृक्षारोपण

अमळनेर: पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आज 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने लायन्स क्लब अमळनेर च्या सदस्या सौ. वर्षा दोडीवाल यांच्या नातु प्रियांशच्या पहील्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना खाऊ व वही पेन भेट वस्तू देण्यात आले तसेच शिक्षकांना शिक्षक दिना निमित्ताने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर तसेच लिनेस क्लब अमळनेर च्या प्रेसिडेंट सौ. राजूल गांधी, सदस्य सौ. जेस्मिन भरुचा(Multiple Cabinet post Meri) , सौ. वर्षा दोडीवाल, सौ. शितल देसाई, सौ. निकीता दोडीवाल, श्री . रोनक दोडीवाल हे उपस्थित होते. यांचा सत्कार प्राचार्या सौ. जयश्री पाटील मॅडम यांनी केला तर प्रास्ताविक कुमारी प्रज्ञा पाटील मॅडम, यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री खाटीक सर, श्री विजय चौधरी सर, श्री विजय धनगर सर, श्री सखाराम पावरा, श्री उमेश पाटील यांनी सहकार्य केले

[democracy id="1"]